Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंगवर बिग बी का झाले मेहेरबान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 19:41 IST

बॉलिवूडचा मेगास्टार अमिताभ बच्चन हे त्याच्या उत्कृष्ट अभिनयावर भलतेच मेहेरबान झाले आहेत. अलीकडेच त्यांनी सुशांतसिंगचे तोंडभरून कौतुक केल्याचे कळतेय.

‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने चित्रपटात केलेल्या उत्कृष्ट अभिनयाने ‘बी टाऊन’ चे सर्वच कलाकार प्रभावित झाले. सोशल मीडियावर त्याला सर्वांनी शुभेच्छा देखील दिल्या. पण, एक कलाकार मात्र त्याच्या या कामगिरीवर जाम खुश झालाय. ठाऊक आहे का? कोण आहे हा कलाकार? होय, बॉलिवूडचा मेगास्टार अमिताभ बच्चन हे त्याच्या उत्कृष्ट अभिनयावर भलतेच मेहेरबान झाले आहेत. अलीकडेच त्यांनी सुशांतसिंगचे तोंडभरून कौतुक केल्याचे कळतेय. २०१६ मध्ये भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये सुशांतसिंग राजपूतने काम केले. या बायोपिकने चक्क बॉलिवूडचा शहंनशाह अमिताभ बच्चन यांचे मन जिंकले. बिग बींनी सुशांतसोबत एक मुलाखत शेअर केलीय की, त्यांच्याकडे असलेल्या कमिटमेंट्समुळे ते एम.एस.धोनी चित्रपट पाहू शकले नाहीत. पण, लवकरच ते हा चित्रपट पाहणार असल्याचे त्यांनी कबूल केले आहे. तसेच त्यांनी सुशांतला त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पुष्पगुच्छ पाठवला असून त्यासोबत त्याचे कौतुक करणारे स्वलिखित पत्र देखील ठेवलेले आहे. हा फोटो पाहून सुशांतने बिग बींचे आभार मानले. त्यांना सुशांतचा परफॉर्मन्स आवडल्याचे कळाल्यानंतर त्याला प्रचंड आनंद झाला.’ बॉलिवूडचा मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी एखाद्या कलाकाराचे कौतुक करणे म्हणजे त्याच्या कामाला पोचपावती देण्यासारखे आहे. आता असं म्हणायला हरकत नाही की, ‘सुशांत, अब तेरी तो निकल पडी.’