Join us
Daily Top 2Weekly Top 5

Suicide Or Murder: बायोपिकमध्ये हा अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, हुबेहुब दिसतो सुशांत सारखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 19:37 IST

सुशांत सिंग राजपूतच्या आयुष्यावर ‘न्याय- द जस्टिस’ हाच एक सिनेमा नाही तर आणखी एक सिनेमा बनवण्यात येत आहे. 'suicide or murder ' असे या सिनेमाचे नाव आहे.

सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. पण त्याच्या या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर साकारलेला सिनेमा मात्र बनून तयार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीजर रिलीज झाला होता. ‘न्याय- द जस्टिस’ असे या सिनेमाचे नाव आहे. येत्या 11 जूनला सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होतेय. त्यादिवशी दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली देत हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.हा सिनेमा सुशांतच्या मृत्यू प्रकरणावर बेतलेला आहे. अभिनेता जुबेरने यात सुशांतची व्यक्तिरेखा साकारली आहे तर श्रेयाने रिया चक्रवर्तीचे पात्र जिवंत केले आहे.

सुशांतच्या आयुष्यावर  ‘न्याय- द जस्टिस’ हाच एक सिनेमा नाही तर आणखी एक सिनेमा बनवण्यात येत आहे. 'suicide or murder ' असे या सिनेमाचे नाव असून मुख्य भूमिकेत अभिनेता सचिन तिवारी झळकणार आहे. सचिन हुबेहूब सुशांत सारखा दिसतो. त्यामुळे पहिल्यांदा पाहताना सुशांतच असल्याचा भास तुम्हालाही होईल. त्याला पाहून अनेकांना सुशांतची आठवण आली.

 

विशेष म्हणजे सचिन हा पूर्वी टिकटॉवर व्हिडीओ बनवायचा. तेव्हापासून त्याला सुशांतचा डुब्लिकेट म्हणूनच ओळखले जायचे. सुशांतची कार्बन कॉपी म्हणून टिकटॉकवर तो प्रसिद्ध होता. कार्बन कॉपी म्हणून ओळखला जाणारा सचिन आता सुशांत बनत रसिकांच्या भेटीला येणार आहे. सुशांतच्या आयुष्यावर एक नाही तर दोन सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहेत.

त्याच्यासाठी RIP कसे लिहू? मी आजही सुशांतसोबत बोलते...! अंकिता लोखंडेने ट्रोलर्सला दिले उत्तर

सुशांत सिंग राजपूत या जगात नाहीये. पण अद्यापही सुशांत नाही, हे मानायला मन तयार नाही. सुशांतच्या मृत्यू हा त्याच्या तमाम चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. त्याच्या कुटुंबाबद्दल आणि सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकितासाठी तर अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. सुशांत गेला पण मी अजूनही त्याच्यासोबत बोलू शकते, असे अंकिताने म्हटले होते

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत