Join us
Daily Top 2Weekly Top 5

बूडापेस्टमध्ये सुशांत-कृतीचा रोमान्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 13:13 IST

  सुशांतसिंग राजपूत, अंकिता लोखंडे, कृती सेनन हा प्रेमाचा त्रिकोण सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतो आहे. सुशांतसिंग आणि कृती ...

  सुशांतसिंग राजपूत, अंकिता लोखंडे, कृती सेनन हा प्रेमाचा त्रिकोण सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतो आहे. सुशांतसिंग आणि कृती सेनन हे सध्या ‘राब्ता’ चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. दिनेश व्हिजन हे या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात एन्ट्री करत आहेत.चित्रपट  २०१७ च्या ‘व्हॅलेंटाईन डे’ ला रिलीज होणार आहे. सुशांत आणि कृती यांना एकमेकांची कंपनी फारच आवडते आहे हे या फोटोंमधून कळते आहे. सुशांत आणि कृती म्हणतात की,‘ बुडापेस्टमध्ये उणे २ तापमान असून अतिशय थंड वातावरण आहे.पण, फॉरेन कंट्रीत शूटिंगची मजाच काही और आहे. आम्ही अनेकवेळा कॉफी शॉप्समध्ये जाऊन आमचे विकली आॅफ्स एन्जॉय केले आहेत.’