Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पुन्हा फुलणार सुशांत-परिणीतीचा रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 20:31 IST

‘शुद्ध देसी रोमान्स’नंतर परिणीती चोपडा आणि सुशांत सिंह राजपूत यांचा रोमान्स फुलतांना दिसणार आहे. होय, निर्मात दिनेश विजय यांच्या नव्या प्रोजेक्टमध्ये ही जोडी पुन्हा दिसणार आहे.

‘शुद्ध देसी रोमान्स’नंतर परिणीती चोपडा आणि सुशांत सिंह राजपूत यांचा रोमान्स फुलतांना दिसणार आहे. होय, निर्मात दिनेश विजय यांच्या नव्या प्रोजेक्टमध्ये ही जोडी पुन्हा दिसणार आहे. होमी अदजानिया दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव आहे,‘तकदूम’.‘तकदूम’ही एक प्रेमकथा आहे. यात सुशांत आणि परि लीड रोलमध्ये दिसणार आहे. मोस्ट टॅलेन्टेड इरफान खानही या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. येत्या आक्टोबरमध्ये हा चित्रपट  फ्लोरवर येणार आहे तर पुढील वर्षी जुलैमध्ये रिलीज होईल. आता ‘शुद्ध देसी रोमान्स’नंतर परी-सुशांतची जोडी काय कमाल करते, ते दिसेलच..