Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेच डोळे, तीच स्माईल; Video पाहून चाहत्यांना आली 'सूर्यवंशम' च्या सौंदर्याची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 12:53 IST

चाहते म्हणतात, हिरा ठाकूरच्या पत्नीचा पुनर्जन्म...!

बॉलिवूडमधील सर्वात जास्त वेळा पाहिला गेलेला सिनेमा म्हणजे अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम' (Sooryawansham). टीव्हीवर आजही हा सिनेमा सतत प्रसारित होतो आणि अजूनही लोक त्याच उत्साहाने पाहतात. सिनेमातील मुख्य अभिनेत्री सौंदर्याचं (Soundarya) काही वर्षांपूर्वीच अपघाती निधन झालं. मात्र आता हुबेहुब सौंदर्यासारखीच दिसणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

तोच चेहरा, तीच स्माईल...सोशल मीडियावर चित्रा नावाच्या महिलेचे व्हिडिओ पाहून तुमचीही गफलत होईल. तिचा चेहरा हुबेहुब अभिनेत्री सौंदर्या सारखाच आहे.आधी तर सर्वांना हे  AI ने केलंय असंच वाटलं. मात्र चित्राचं अकाऊंट पाहिलं तर लक्षात येईल की तिचा चेहरा सौंदर्याशी अगदी मिळताजुळता आहे. शिवाय तिची स्माईलही अगदी सौंदर्यासारखीच भासते. तिचे व्हिडिओ पाहून चाहत्यांना कमालीचं आश्चर्य वाटत आहे.

इन्स्टाग्रामवर Chitra_jii2 या नावाने अकाऊंट आहे. यावर चित्रा तिचे रील्स पोस्ट करत असते. तिला बघून प्रत्येकाच्याच डोळ्यासमोर सूर्यवंशमच्या सौंदर्याचा चेहरा येईल यात शंका नाही. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 'मी सौंदर्या मॅडमचा मोठा चाहता आहे, तू हुबेहूब त्यांच्यासारखी दिसतेस पण तिच्यासोबत तुलना होऊ शकत नाही.' असं एकाने लिहिलंय. तर आणखी एका चाहत्याने लिहिले,'मी कॅप्शन वाचलं नसतं तर तुला सौंदर्याच समजलो असतो. माझ्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक.'  तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

टॅग्स :बॉलिवूडसोशल मीडियासोशल व्हायरल