सुरज आणि फवाद पडले एकाच मुलीच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 11:26 IST
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेला धडकन हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आता या ...
सुरज आणि फवाद पडले एकाच मुलीच्या प्रेमात
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेला धडकन हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आता या चित्रपटाच्या रिमेकची तयारी सुरू आहे. या चित्रपटामध्ये फवाद खान, सुरज पांचाली काम करणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाची कथा ही तरुणांवर आधारित असल्याने फवाद खान आणि सुरज पांचोली या तरुण अभिनेत्यांचा या चित्रपटासाठी विचार करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाची नायिका कोण असणार हे अद्याप ठरले नसले तरी नायिकेचा शोध सध्या जोरात सुरू आहे. सगळ्या कलाकारांची निवड झाल्यानंतर या चित्रपटाची घोषणा करत येणार असल्याचे म्हटले जात आहे.