'क्वीन'विरोधातल्या लढाईसाठी 'सुपरहिरो'नं बदलला वकील ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 12:45 IST
बॉलीवुडचा सुपरहिरो आणि बॉलीवुडची क्वीन यांच्यात सध्या कायदेशीर महासंग्राम सुरु आहे. आता या महासंग्रामात क्वीन कंगणाचा सामना करण्यासाठी हृतिकचे ...
'क्वीन'विरोधातल्या लढाईसाठी 'सुपरहिरो'नं बदलला वकील ?
बॉलीवुडचा सुपरहिरो आणि बॉलीवुडची क्वीन यांच्यात सध्या कायदेशीर महासंग्राम सुरु आहे. आता या महासंग्रामात क्वीन कंगणाचा सामना करण्यासाठी हृतिकचे वकील कमी पडतायत की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळंच हृतिकनं आता आपले वकील बदललेत. हृतिकनं हा खटला आता प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ महेश जेठमलानी यांच्याकडे सुपूर्द केल्याचं बोललं जातंय. आता जेठमलानी हृतिकची बाजू कोर्टात मांडतील. याबाबत स्पष्ट बोलण्यास जेठमलानी यांनी मात्र नकार दिलाय. दुसरीकडे कंगणाविरोधात हृतिकची बाजू मांडणा-या दिपेश मेहता यांनी या गोष्टीचा इन्कार केलाय. हृतिक वेळोवेळी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत असतो. याआधी आपण अमित देसाई यांची मदत घेतली होती आणि गरज वाटल्यास मुकुल रोहतगी यांचाही या खटल्याविषयी सल्ला घेईल असं दिपेश मेहता यांनी म्हटलंय.