Join us

सुपर मामुचा ‘सुपर शर्मा’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 08:40 IST

आपल्याला माहिती आहे की, सलमान  खानचा त्याची बहीण अर्पितावर खुप जीव आहे. तिने काही दिवसांपूर्वी मुलाला जन्म दिला आहे. ...

आपल्याला माहिती आहे की, सलमान  खानचा त्याची बहीण अर्पितावर खुप जीव आहे. तिने काही दिवसांपूर्वी मुलाला जन्म दिला आहे. जेव्हा सलमानला कळाले की, अर्पिताने बाळाला जन्म दिला तेव्हा तो ‘सुल्तान’ ची शूटिंग अर्धवट सोडून तिला भेटायला निघून आला.पण, आता मात्र, मामु सलमानला ज्युनियर शर्माला सोडून जावेसेच वाटत नाहीये. तसाच त्याचा भाच्चा अहिल शर्माही त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवून आपला खोडकरपणा संपूर्ण खान कुटुंबियांना दाखवत आहे. अहिलचे काही क्लिक्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.त्याच्या टीशर्टवर ‘सुपर शर्मा’ असे लिहिलेले दिसत आहे. त्याच्या मामुसारखाच तो ही झोपलेला दिसतो आहे. वेल, मामा-भाच्च्याची जोडी चांगलीच जमलेली दिसते आहे.