Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला माहिती आहे का, सुपर 30 च्या सेटवर ऋतिक रोशन या व्यक्तींसोबत असायचा बिझी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 15:46 IST

‘सुपर 30' ऋतिक रोशन एका शिक्षकाची भूमिका साकारत आहे.‘सुपर 30’ हा सिनेमा गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

ठळक मुद्दे आनंद कुमार बिहारमध्ये सुपर 30 नावाचा एक उपक्रम चालवतातऋतिक रोशनचा हा सिनेमा येत्या २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

‘सुपर 30' ऋतिक रोशन एका शिक्षकाची भूमिका साकारत आहे. ‘सुपर 30’ हा सिनेमा गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आपला पूर्ण वेळ तो विद्यार्थ्यांसोबत असायचा. आनंद कुमार बिहारमध्ये सुपर 30 नावाचा एक उपक्रम चालवतात. या उपक्रमातंर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.

जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. त्यामुळे शूटिंग दरम्यान आणि त्यानंतर ही ऋतिक आपला सर्वाधिक वेळ मुलांसोबत असायचा. एवढंच नाही तर त्याने मुलांचे दोन गट करुन वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवायला द्यायचा. यात ऋतिकसह मृणाल ठाकूर, अमित साध आणि नंदीश संधू दिसणार आहेत.

गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्याबाबत बोलायचे झाले तर त्यांनी १९९२मध्ये गणित हा विषय शिकवायला सुरवात केली होती त्यावेळेस त्यांनी सुरवातीला महिना ५०० रुपये देऊन भाड्याच्या खोलीत शिकवायला सुरवात केली होती. पण नंतरच्या २ वर्षात याच्याकडे २ विद्यार्थ्यांपासून ३६ विद्यार्थी झाले आणि नंतर त्याच्याकडील विद्यार्थ्यांची संख्या ५०० वर गेली. पुढे त्यांनी ‘सुपर 30’ ची सुरवात केली.  ऋतिक रोशनचा हा सिनेमा येत्या २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

टॅग्स :हृतिक रोशन