Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सनीचे ‘ लिप-लॉक’..पण कुणासोबत??

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 19:01 IST

सनी लिओनीने ‘रागिनी एमएमएस २’नंतर आॅनस्क्रीन किसींग सिन देणे बंद केले आहे, अशी बातमी आहे. या बातमीच्या उत्तरादाखल सनीने ...

सनी लिओनीने ‘रागिनी एमएमएस २’नंतर आॅनस्क्रीन किसींग सिन देणे बंद केले आहे, अशी बातमी आहे. या बातमीच्या उत्तरादाखल सनीने एक फोटो पोस्ट केला आहे. यात सनी तिचा पती डेनियल वेबरसोबत लिप-टू-लिप करताना दिसत आहे. सनी  आज आपला ३५ वा वाढदिवस साजरा करतेयं. वाढदिवसाचे निमित्त साधून सनीने आज हा हॉट अ‍ॅण्ड हॉटेस्ट फोटो शेअर केला. शिवाय ती यापुढे कधीही कॅमेºयापुढे किस करणार नाही, या अफवेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्नही केला. ‘कोण म्हणे, मी कॅमेºयापुढे किस करणार नाही..’असे कॅप्शन या फोटोसोबत सनीने लिहिले. खरे तर सनी स्वत:वरील ‘पोर्न स्टार’ हा शिक्का पुसून टाकायचा आहे. बॉलिवूड प्रेक्षकांमध्ये तिला आपली प्रतीमा सुधारायची आहे. कदाचित याचमुळे ‘रागिनी एमएमएस२’नंतर सनीने कुठलाही लिप-लॉक सिन दिलेला नाही. अर्थात सनीने याबाबत कुठलेही अधिकृत बयान दिलेले नाही. मात्र तिच्या चित्रपटांमधून हे दिसते आहे. अलीकडे रिलीज झालेल्या सनीच्या ‘वन नाईट स्टँड’मध्येही सनीने कुठलाही किसींग सिन दिलेला नाही.