Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मस्तीजादे' मध्ये सनीचे 'बेबी डॉल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:12 IST

एक्स पॉर्न स्टार सनी लियोनवर चित्रीत करण्यात आलेले 'बेबी डॉल ' हे गाणे खुप पसंत क रण्यात आले. मीत ...

एक्स पॉर्न स्टार सनी लियोनवर चित्रीत करण्यात आलेले 'बेबी डॉल ' हे गाणे खुप पसंत क रण्यात आले. मीत ब्रदर्स यांच्याद्वारे बनवण्यात आलेल्या या गाण्याची जादू अजूनही कमी झालेली नाही. सनीचे हे गाणे आता तिच्या आगामी एका चित्रपटात ऐकायला पुन्हा मिळणार आहे. 'मस्तीजादे' च्या निर्मात्यांनी 'बेबी डॉल' गाण्याचे अधिकार भूषण कु मार यांच्याकडून खरेदी केले आहेत. आता हेच गाणे 'मस्तीजादे'मध्ये तुषार कपूर आणि सनी लियोन यांच्यावर चित्रीत करण्यात येईल.मिलाप जावेरी म्हणाले,' चित्रपटात सनीची भूमिका जुळ्या बहिणींची असून त्यातील एक तुषारसोबत संबंध बनवू इच्छिते. परंतु, खुप प्रयत्न करूनही ती तुषारला आकर्षित करू शकत नाही, तेव्हा ती सुंदर साडी नेसून येते आणि त्यावेळी चित्रीत केलेले हे गाणे आहे. या गाण्याचे शब्द बदलण्यात येणार आहेत. हे एक गमतीदार गाणे आहे. '