Join us

सनी झाली लेखिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 18:52 IST

सनीचा हा नवा अवतार नक्कीच तुमच्यासाठी धक्कादायक ठरणार आहे. 

पॉर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या चाहत्यांच्या ह्रदयात खोलवर जागा केली आहे. मात्र, एक्टींगमधील आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी सनी आता वेगळ्याच ढंगात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सनीचा हा नवा अवतार नक्कीच तुमच्यासाठी धक्कादायक ठरणार आहे. सनी लेखिकेच्या रुपात पदार्पण करत असून लवकरच तिचे पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे. सनीने 'स्वीट ड्रीम्स' नावाचे एक पुस्तक लिहले असून त्यामध्ये १२ लघुकथा आहेत.लिखान करण्याचे कधीही माझ्या मनात नव्हते, पण माज्याकडे काही विचार होते, जे मी लेखनबद्ध केले नव्हते, असे मस्तीजादेतील या बोल्ड अभिनेत्रीने म्हटले आहे. जगरनॉट बुक या प्रकाशन संस्थेने १२ लघुकथांसाठी सनीशी संपर्क साधला होता.