Join us

​सनी गाणार! पण चित्रपटात नाही!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 20:43 IST

बॉलिवूडची हॉट गर्ल सनी लिओनी हिने टिष्ट्वटरवर पोस्ट केलेल्या एका ताज्या फोटोने नव्या चर्चेला तोंड फुटलेय. ही चर्चा म्हणजे, ...

बॉलिवूडची हॉट गर्ल सनी लिओनी हिने टिष्ट्वटरवर पोस्ट केलेल्या एका ताज्या फोटोने नव्या चर्चेला तोंड फुटलेय. ही चर्चा म्हणजे, सनी तिचा आगामी चित्रपट ‘बेईमान लव’मध्ये गाणे गाताना दिसणार अशी. या फोटोत सनी एका स्टुडिओत माईकजवळ उभी असलेली दिसते आहे. पण आता सनीने स्वत:च या फोटोमागचे सत्य सांगितले आहे. ‘मी कुठल्याही चित्रपटासाठी गात नाहीय. तर एका मोठ्या सोहळ्यासाठी तालीम करतेय. यात खरोखरचं मला गाणे गाताना आपण बघणार आहात. मी प्रचंड नर्व्हस आहे’ असे टिष्ट्वट सनीने केले आहे. म्हणजे सनी सध्या गात नाहीय. पण ती गाणार आहे, एवढे नक्की. सनीचा ‘बेईमान लव’ लवकरच रिलीज होतोय. यात सनीसोबत रजनीश दुग्गल आणि तिचा पती डेनियल वेबेर हे दोघेही आहेत.  याशिवाय  ‘रईस’मध्ये सनी आयटम साँग करताना दिसणार आहे..}}}}}}}}