‘बेईमान लव्ह’ या चित्रपटातील सनी लिओनीचे नवीन गाणे ‘मेरे पीछे हिंदुस्तान है’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात सनी सहकलाकार रजनीश दुग्गल सोबत फ्लर्ट करताना दिसत आहे.
यासेर देसाई आणि सुकृती कक्कडने हे गाणे गायले असून पबमध्ये आणि स्विमिंग पूलमध्ये चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांनी पाहिले आहे. या गाण्यात सनी लिओनी सोबत तिचा नवरा डॅनियल वेबर, राजीव वर्मा आणि जीशा नैंसी सुद्धा दिसणार आहे.