सनी लियोनीने गायले राष्ट्रगीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 12:57 IST
प्रो कबड्डी लीगच्या मैदानात गुरुवारी खेळण्यात आलेल्या सामन्याच्या आधी बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनने राष्ट्रगीत
सनी लियोनीने गायले राष्ट्रगीत
प्रो कबड्डी लीगच्या मैदानात गुरुवारी खेळण्यात आलेल्या सामन्याच्या आधी बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनने राष्ट्रगीत गायले. तिच्या आवाजातील राष्ट्रगीत गायनाने कबड्डी प्रेमींच्या आनंदात भर पडली. विशेष म्हणजे सनी लिओनीने राष्ट्रगीत गाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन घेतले नाही. राष्ट्रगीत गायनाचा मान मिळाल्याने खूप आनंद झाल्याचं व माज्यासाठी हा मोठा बहुमान असल्याची प्रतिक्रिया सनीने दिली आहे. कोणत्याही खेळाला प्रमोट करणाºया गोष्टींचे आपण पैसे घेत नसल्याचे सनी लिओने यावेळी सांगितले.