Join us
Daily Top 2Weekly Top 5

या अजरामर नायिकेच्या बायोपिकसाठी एकट्या सनी लिओनीने दिला होकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 16:43 IST

बॉलिवूडची ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी हिचे बायोपिक करण्यासाठी अद्याप कुठल्याही अभिनेत्रीने होकार दिलेला नाही. आधी या बायोपिकसाठी कंगना राणौतला ...

बॉलिवूडची ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी हिचे बायोपिक करण्यासाठी अद्याप कुठल्याही अभिनेत्रीने होकार दिलेला नाही. आधी या बायोपिकसाठी कंगना राणौतला विचारणा झाली. पण कंगनाने चित्रपटाला नकार कळवला. यानंतर माधुरी दीक्षित हिला आॅफर दिली गेली. पण तिनेही चित्रपट नाकारला. यानंतर मेकर्सनी विद्या बालनला या चित्रपटाची आॅफर दिली. पण विद्याकडूनही मेकर्सला नकारच आला.  अलीकडे विद्याने या नकारामागचे कारण स्पष्ट केले होते. मीना कुमारीसारख्या अजरामर नायिकेची भूमिका पडद्यावर साकारणे कुणाला आवडणार नाही? मलाही ते आवडले असते. पण स्क्रिप्ट केवळ सेंसेशनल नसावी.   हयात नसलेल्या व्यक्तिच्या आयुष्यावर बायोपिक बनत असेल तर त्यामागे योग्य कारण असायलाच हवे.  केवळ ‘देखना सब देखेंगे’ या कारणासाठी बायोपिक तयार होऊ नयेत. म्हणूनच मी हे बायोपिक नाकारले, असे विद्या म्हणाली होती.  एकंदर काय तर मेकर्सने या बायोपिकसाठी ज्यांनाही अ‍ॅप्रोच केले त्या सर्व अभिनेत्रींना चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नाही. पण एक अभिनेत्री मात्र हे बायोपिक करण्यास एका पायावर तयार आहे. ही अभिनेत्री कोण तर सनी लिओनी.होय,मीना कुमारीच्या बायोपिकचे लेखक आणि दिग्दर्शक करण राजदान यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. मी अनेक अभिनेत्रींशी या बायोपिकबद्दल बोललो. यापैकी केवळ सनी लिओनी एकमेव अभिनेत्री होती, जिने या बायोपिकमध्ये रूची दाखवली.कधी सुरूवात करायची, असे तिने मला विचारले. केवळ तिने एकटीने हिंमत दाखवली. मी तिच्याशी चित्रपटासंदर्भात दीर्घ चर्चा केली. पण तिच्या इमेजनुसार, ती या भूमिकेसाठी परफेक्ट आहे वा नाही, हे मला ठाऊक नाही, असे राजदान म्हणाले. आता राजदान सनीबद्दल कुठला निर्णय घेतात, ते ठाऊक नाही. पण चर्चा खरी मानाल तर या बायोपिकसाठी सनीशिवाय आणखी एक नाव चर्चेत आहे. हे नाव आहे, हुमा कुरेशी हिचे.  आता हुमा या चित्रपटाबदद्ल कुठला निर्णय घेते, ते कळेलच.ALSO READ : ​विद्या बालनने मीना कुमारीचे बायोपिक का नाकारले, तुम्हाला ठाऊक आहे?