Join us

तैमूर अली खानला टक्कर देतायत सनी लिओनीची मुलं, सोशल मीडियावर बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 17:30 IST

सनी लियोनी आपल्या जुळ्या मुलांसोबत विमानतळावर दिसली. तिच्यासोबत मुलांना सांभाळण्यासाठी नॅनीसुद्धा होती.

बॉलीवुडमध्ये अभिनेत्रींची कॅट फाईट साऱ्यांनाच माहिती आहे. समकालीन अभिनेत्री आणि कलाकारांमध्ये कायमच स्पर्धा तसंच चढाओढ असते. मात्र अशीच तगडी फाईट या स्टार किड्समध्येही असते.  रुपेरी पडद्यावर काम करणारे हे स्टार किड्स असा तुम्ही विचार करत असाल. मात्र ही टक्कर त्या स्टार किड्समध्ये नाही. ही स्पर्धा सुरू आहे बॉलीवुडच्या दोन नायिकांच्या राजकुमारांमध्ये. या नायिका म्हणजे बॉलीवुडची बेगम अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेत्री सनी लिओनी. या दोघींच्या मुलांमध्ये सध्या वेगळीच स्पर्धा रंगली आहे. ही स्पर्धा आहे लोकप्रियतेची. करीनाचा लेक तैमूर अली खान माध्यमांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तैमूरची कोणतीही गोष्ट लगेच बातमी बनते. असंच काहीसं सध्या घडतंय सनी लिओनीच्या जुळ्या मुलांबाबत. सनी सध्या तिचं आईपण एन्जॉय करतेय.

नुकतंच सनी लियोनी आपल्या जुळ्या मुलांसोबत विमानतळावर दिसली. तिच्यासोबत मुलांना सांभाळण्यासाठी नॅनीसुद्धा होती. एका मुलाला सनीने आपल्या कडेवर घेतले होते तर दुसऱ्या मुलाला नॅनीच्या कडेवर दिले होते. सनीच्या कडेवरील मुलाला पाहून उपस्थित गोंधळले. तिथे असलेल्या लोकांना वाटलं की सनीच्या कडेवर तैमूरच आहे आणि तैमूर तैमूर अशी हाक मारू लागले. सोशल मीडियावर सनी आणि तिच्या मुलाचा हा फोटो व्हायरल होत आहे. सनीची जुळी मुलं आपल्या निरागसतेने तैमूर अली खानला सोशल मीडियावर टक्कर देत आहेत. पती डॅनिअल आणि मुलांसोबत सनी कायमच पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत असते.

टॅग्स :तैमुरसनी लिओनी