सनी लिओनच्या सुखी संसारासाठी ‘टिप्स’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 17:50 IST
विख्यात अभिनेत्री सनी लिओनने सुखी संसाराच्या टिप्स दिल्या आहेत. जानेवारी २००९ साली डॅनिअल वेबरशी लग्न केलेल्या सनीच्या अनुसार आनंदी ...
सनी लिओनच्या सुखी संसारासाठी ‘टिप्स’
विख्यात अभिनेत्री सनी लिओनने सुखी संसाराच्या टिप्स दिल्या आहेत. जानेवारी २००९ साली डॅनिअल वेबरशी लग्न केलेल्या सनीच्या अनुसार आनंदी आणि यशस्वी लग्न ही तडजोड आहे.‘लग्न म्हणजे विश्वास आणि तडजोड आहे. मी आनंदी पत्नी, आनंदी आयुष्य या गोष्टीवर विश्वास ठेवते. मात्र हे तडजोडीवर, विनाअट प्रेमावर आणि एकमेकांशी असणारा समन्वय तसेच विश्वासावर अवलंबून आहे.’तडजोड हा संबंधातील सर्वात महत्वाचा भाग असल्याचे सनीला वाटते. ‘प्रत्येक गोष्टीवर अवलंबून न राहण्यासाठी तडजोड महत्वाची असते. प्रत्यक्षात ते कशा पद्धतीने उतरते हे पाहणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे तडजोड खूपच महत्वाची असल्याचे सनी म्हणते. २०१२ साली सनीने जिस्म २ द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तिला बाहेरुन आल्यासारखे वाटत असल्याचे तिने म्हटले होते. ‘या इंडस्ट्रीमध्ये मला खूप चांगले लोक भेटले, त्याचा मला आनंद वाटतो, असे सनी म्हणाली. रईस या चित्रपटात शाहरुख खानसमवेत सनीने खास गाणे केले आहे. १९८० साली कुर्बानी चित्रपटातील ‘लैला ओ लैला’ प्रमाणे हे गाणे असणार आहे. शाहरुखसोबत काम करणे हे माझ्यासाठी स्वप्न असल्याचे तिने सांगितले. माझे स्वप्न पूर्ण झाले. मी शाहरुखसोबत काम करुन खूपच उत्सुक आणि आनंदी आहे. मला स्वत:ला नशीबवान असल्याचे वाटते. चित्रपट आपटला तर खूप वाईट वाटते. तुम्ही कोणताही चित्रपट करीत असताना त्यात अगदी जीव ओतून करता. त्याउपरही चित्रपट यशस्वी झाला नाही तर त्याचा कामावर परिणाम होतो, असे सनी म्हणाली.३५ वर्षीय सनी एमटीव्ही स्प्लिटव्हिला सिझन ९ मध्ये काम करते आहे. ११ जून पासून त्याचा प्रारंभ होईल.