Join us

सनी लिओनीच्या मुलीला या गोष्टीची आवड , लहान वयातच लागलेली ही सवय पाहून सनी झाली थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 15:23 IST

परिस्थिती सुरळीत झाल्यावर सनी लिओनीला पुन्हा भारतातही परतायचे असल्याचे तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते.

लॉकडाऊन झाल्यापासून सनी लिओनी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. आपल्या कुटुंबासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतेय. सध्या मिळालेल्या वेळेत ती काय काय नवीन गोष्टी करते याविषयीची माहिती चाहत्यांसह शेअर करत असते. नुकताच सनीने मुलगी निशाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो नक्कीच कौतुकास पात्र आहे असाच आहे. कारण यात चिमुकली निशा चक्क घोडेस्वारी शिकत असल्याचे पाहायला मिळते आहे. सनी लिओनीनेही मुलीचे कौतुक करताना थतक नाही. इतक्या लहान वयात निशाची ही आवड पाहून ती ही थक्क झाली आहे. खरंच निशाचा मला खूप अभिमान वाटत असल्याचे सनीने म्हटले आहे. 

लॉकडाऊनमध्ये सनी कुटुंबासह भारतातच होती. मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू होताच सनीने पती डॅनियल वेबर आणि तिन्ही मुले निशा, नोहा आणि आशेरसह कॅलिफोर्नियाला रवाना झाली होती.  एका पोस्टद्वारे सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत ती जागा मुलांसाठी अधिक सुरक्षित आहे. तसेच कॅलिफोर्नियात सनीचा आलिशान बंगला आहे.  

तसेच परिस्थिती सुरळीत झाल्यावर सनीला पुन्हा भारतातही परतायचे असल्याचे तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. मात्र सनीवर तिचे चाहते प्रचंड टीका आणि संतप्त झाले आहेत. तिच्या पोस्टवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रीया देत म्हटले आहे की, 'ज्या देशातल्या लोकांनी तुला मोठं केलं, चित्रपटांमध्ये काम दिलं, जिथं पैसा कमावला', त्या देशाला तू असुरक्षित कसं म्हणू शकतेस? असा प्रश्नही तिला विचारला आहे.

टॅग्स :सनी लिओनी