Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिओनीचा अमेरिकेत 5 BHK आलिशान बंगला, फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 19:47 IST

पॉर्न स्टार ते अभिनेत्री असा प्रवास करणारी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी भारतात आली आणि इथेच स्थायिक झाली.

पॉर्न स्टार ते अभिनेत्री असा प्रवास करणारी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी भारतात आली आणि इथेच स्थायिक झाली. सनीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आता लवकरच ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री करणार आहे. ती मल्याळम चित्रपटात काम करणार आहे. सनी अभिनेत्रीसोबत एक उत्तम बिझनेस वुमन आहे. तिने नुकतंच तिचा नवरा डेनियल वेबर सोबत मिळून मुंबईतील जुहू इथे द आर्ट फ्युजन नावाचं प्ले स्कूल सुरू केलं आहे.

सनी लिओनी भारतात शिफ्ट होण्यापूर्वी अमेरिकेत राहत होती. अमेरिकेतील लॉस अँजेलिसमध्ये सनीचा आलिशान बंगला आहे. जो खूप सुंदर आहे. सनी लिओनी आणि तिचा पती डेनियल वेबर यांचा हा 5 BHK बंगला शेर्मन ओक्स इथं आहे. जे ठिकाण बेवर्ली हिल्सपासून ३० मिनिटांच्या अंतरावर आहे.

सनीने हा बंगला स्वत:च्या ३६व्या वाढदिवशी स्वत:लाच गिफ्ट केला होता आणि याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. एक एकर जमिनीवर असलेल्या या बंगल्याचे फोटो सनीनं आपल्या वाढदिवसाच्या चार दिवसांनंतर इंस्टाग्रामवर फॅन्ससाठी शेअर केले होते.

हे सुंदर घर विकत घेतल्यानंतर डेनियल म्हणाला होता की, सनी आणि मला खूप काळापासून घर विकत घेण्याची इच्छा होती. या आठवड्यात घराचं पझेशन मिळालं. आम्ही आपल्या घरासाठी इटली, रोम आणि स्पेनहून सामान विकत घेतलं आहे.

आमचं घर आमची पर्सनॅलिटी आणि टेस्ट कशी आहे ते दर्शवतं. डेकोरसाठी आम्ही जगभरात फिरतोय आणि आमचे शेजारी कोण हे जाणून घेण्यासाठीही उत्सुक आहे.’

सनीच्या बंगल्यात पाच बेडरूम, एक होम थिएटर, स्विमिंग पूल, आऊट डोअर डायनिंग एरिया आणि मोठं गार्डन आहे. सनी व डॅनिएलने घरी गणपतीच्या मूर्तीची देखील स्थापना केली आहे. सनीचं घर लॉस अँजेलिसमधील हॉलिवूड साइनपासून काही अंतरावर आहे.

टॅग्स :सनी लियोनी