Join us

सनी लिओनीने शेअर केला 'अनामिका'च्या सेटवरचा व्हिडीओ, मुंबईत शूटिंग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 16:59 IST

सनी सध्या या वेबसिरीजच्या शूटिंगमध्ये बिझी आहे

सनी लिओनी  सध्या 'अनामिका' या तिच्या आगामी वेबसिरीजच्या तयारीला लागली आहे. सनी सध्या या वेबसिरीजच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या वेबसिरीजचे दिग्दर्शन विक्रम भट करत आहेत. सनी यात अ‍ॅक्शन सिरीजमध्ये खतरनाक स्टंट करणार आहे. सनीसाठी स्टंट करण्यासाठी यासर मुनीरची निवड करण्यात आली आहे. सिरीजमध्ये सनीचे खतरनाक स्टंट यासर करणार आहे. याची माहिती सनीने इन्स्टाग्रामवर यासरसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन दिली आहे. 

 सनी या व्हिडीओत यासर मुनीरसोबत मस्ती करताना दिसतेय. सनी आणि मुनीर यात कॅमेऱ्याकडे बघून बॉक्सिंग करताना दिसतायेत. सनीने व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना यासर मुनीरचे आभार मानले आहेत. ऐकूणच सनी अनामिकाच्या सेटवर धमाल मस्ती करताना दिसतेय. 'अनामिका' ही 10 एपिसोडची  अ‍ॅक्शन वेबसिरीज आहे आणि तिचे शूटिंग मुंबईत सुरु आहे.  सनी लिओनीची ही वेबसिरीज एमएक्स प्लेयरवर रिलीज होणार आहे.

सनी लिओनी शेवटची नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अथिया शेट्टीसोबत 2019 मध्ये ‘मोतीचूर चकनाचूर’ चित्रपटात दिसली होती. या सिनेमात त्याने एक कॅमिओ केला होता. सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. 

टॅग्स :सनी लिओनी