Join us
Daily Top 2Weekly Top 5

गरजुंच्या मदतीसाठी पुढे आली सनी लिओनी, पती डॅनिअलसह केले अन्नाचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 11:15 IST

सोशल मीडियावर सनी लिओनी तिच्या चाहत्यांसह संपर्कात असते. तिच्या प्रोजेक्टची माहिती असो किंवा मग कुटुंबास खास क्षण सेलिब्रेट करणे असो सगळ्या गोष्टी ती सोशल मीडियावर मांडताना दिसते.

कोरोनाकाळात अनेक सेलिब्रेटी दिवस रात्र मदत करताना दिसत आहेत. या आता सनी लिओनीदेखील पतीसह मदतीसाठी पुढे आली आहे. हळू हळू सर्व पुर्वपदावर येत असले तरी काहींना गेल्या काही महिन्यांपासून दोन वेळच्या जेवणासाठीही तारेवरची कसरत करावी लागत आहे. गरजुंसाठी सनी लिओनीने पुढाकार घेतला आहे. रस्त्यावर अन्नादान करताना दिसली.

सनी लिओनीचा कोरोना काळात अन्नदान करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सनी लिओनीचे चाहते भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत. अभिनयासोबतच सोशल कार्यातही ती सक्रीय असते. वेळोवेळी विविध माध्यमातून ती समाज कार्य करताना दिसते.

सोशल मीडियावर सनी लिओनी तिच्या चाहत्यांसह संपर्कात असते. तिच्या प्रोजेक्टची माहिती असो किंवा मग कुटुंबास खास क्षण सेलिब्रेट करणे असो सगळ्या गोष्टी ती सोशल मीडियावर मांडताना दिसते. जगभरात तिचा चाहता वर्ग आहे. सनी लिओनी तीन मुलांची आई आहे. मुलांसह तिचे खास फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेक कार्यक्रमात सनी तिची मुलगी निशासह पाहायला मिळते. 

जुलै 2017 मध्ये सनी आणि तिचे पती डेनियल यांनी 21 महिन्यांच्या निशाला महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातून दत्तक घेतले होते. तिचं नाव निशा कौर वेबर असं ठेवलं.निशाला दत्तक घेण्याच्या प्रक्रियेला २ वर्ष वेळ लागला आणि तेव्हापासून सनी आणि डॅनिअल चांगले आई-वडील होण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

सनीने सांगितलं की, तिचं आमच्या जीवनात येणं आनंददायी आहे. सनीला तिच्या मुलीपासून काहीही लपवायचं नाहीये. योग्य वेळ आल्यावर तिचे खरे आई - वडिल कोण आहेत याविषयी सगळी माहिती तिला देण्यात येईल असेही सांगितले होते.

टॅग्स :सनी लिओनीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस