सनी लिओनी म्हणतेय, ‘घाबरू नका सुपरवुमेन तुमच्या रक्षणासाठी सज्ज आहे’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 18:19 IST
सनी लिओनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून त्यामध्ये म्हटले की, ‘घाबरू नका मी तुमच्या रक्षणासाठी सज्ज आहे. वाचा सविस्तर!
सनी लिओनी म्हणतेय, ‘घाबरू नका सुपरवुमेन तुमच्या रक्षणासाठी सज्ज आहे’!
जगातील बहुतांश देश सध्या हॅलोवीनच्या सेलिब्रेशनमध्ये व्यस्त आहेत. या फेस्टिव्हलमध्ये सेलिब्रिटी तथा सर्वसामान्य भूताप्रेतांच्या गेटअपमध्ये बघावयास मिळतात. मात्र बॉलिवूडची आयटम गर्ल सनी लिओनी हॅलोवीनचे सेलिब्रेशन करण्यासाठी सुपरवुमेनच्या गेटअपमध्ये बघावयास मिळाली. सनीने इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट पिक्स शेअर केले. फोटो शेअर करताना सनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सर्वांना हॅलोवीनच्या शुभेच्छा घाबरायचे कारण नाही. सुपरवुमेन तुमच्या रक्षणासाठी तयार आहे.’ सनीच्या या हटके पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनीही तिच्यावर जोरदार स्तुतिसुमने उधळली. दरवर्षी ३१ आॅक्टोबरच्या रात्री हॅलोवीन डे जगभरात सेलिब्रेट केला जातो. आयरलॅण्ड, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, न्यूझिलंड आणि आॅस्ट्रेलिया या देशांमध्ये हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून भारतासारख्या देशामध्येही या दिवसाबद्दलची क्रेझ बघावयास मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच गौरी खानने मुंबईमध्ये हॅलोवीन डेचे आयोजन केले होते. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सेलिब्रिटींचा सेक्सी अंदाज बघण्यासारखा होता. शाहरुखची मुलगी सुहाना खानने तर या सेलिब्रेशन पार्टीत हजेरी लावून जणूकाही चार चॉँद लावले होते. असो, सनी लिओनीच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, लवकरच ती ‘तेरा इंतजार’ या रोमॅण्टिक थ्रिलर चित्रपटात बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात तिच्या अपोझिट अरबाज खान असून, दोघांची केमेस्ट्री बघण्यासारखी आहे. सध्या सनी तिच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पोर्न स्टार ते बॉलिवूडची आयटम गर्ल अशी ओळख असलेली सनी सध्या प्रचंड लोकप्रिय झाली असून, तिच्या फॅन फॉलोअर्सची संख्याही प्रचंड आहे. इन्स्टाग्रामवर सनी खूप अॅक्टीव्ह असून, तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून भरभरून पसंत केले जाते.