सनी लिओनी म्हणाली,‘मी स्वत:ला सिद्ध केलं’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 18:08 IST
‘बॉलिवूडची हॉट लैला’ सनी लिओनी ही ‘बी टाऊन’ च्या सर्वांत हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. पूर्वाश्रमीची पॉर्नस्टार असलेली सनी आज ...
सनी लिओनी म्हणाली,‘मी स्वत:ला सिद्ध केलं’
‘बॉलिवूडची हॉट लैला’ सनी लिओनी ही ‘बी टाऊन’ च्या सर्वांत हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. पूर्वाश्रमीची पॉर्नस्टार असलेली सनी आज ए लिस्टर्स अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. नुकतेच तिला ‘रईस’ मध्ये शाहरूख खानसोबतही काम करायला मिळाले आहे. एवढं सगळं कौतुक, नाव असतानही सनी लिओनीला कोणती खंत सतावते आहे? ती म्हणते,‘काही वर्षांपूर्वी जेव्हा मी इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं तेव्हा मला कुणीही लगेचच भूमिका दिल्या नाहीत. उलट, ‘तुझं इथं काही जमणार नाही. तुला छोटे मोठे रोल करून परतावं लागेल.’ अशी वाक्यं मला ऐकायला मिळाली. पण, मला असं वाटतं की, रईस चित्रपटातील माझ्या गाण्यामुळे सर्वांना माझं महत्त्व कळालं असणार आहे. शाहरूख खानसोबत काम करायला मिळणं हे इंडस्ट्रीत पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येकच कलाकाराला वाटतं. मात्र, प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत नाही. शाहरूखसोबत काम करण्याचं सनीचंही स्वप्न होतं. ते ‘रईस’ मधील ‘लैला मैं लैंला’ या गाण्यामुळे साकार झालं. तिच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगताना ती म्हणते,‘ माझा प्रवास अत्यंत कठीण असा आहे. चित्रपटात काम मिळवण्यासाठी मला खुप लोकांचे बोलणे ऐकून घ्यावे लागले. खुप स्ट्रगलनंतर मला चित्रपट मिळू लागले. मला सोशल मीडियानेच मोठे केले. त्यामुळे मी स्वत:ला सोशल मीडिया प्रोडक्टच मानते.’सनी लिओनी हिने ‘जिस्म २’,‘कुछ कुछ लोचा हैं’ यासारख्या सेक्स कॉमेडीवर आधारित चित्रपटांमध्ये काम केलं. आव्हान स्विकारणाऱ्या सनीने प्रत्येक भूमिकेतील चॅलेंजला टक्कर देण्याचा निर्णय घेतला. मग तिची एका पॉर्नस्टारपेक्षा अभिनेत्री म्हणून बी टाऊनला ओळख झाली. Also Read :* watch video : सनी म्हणते,‘कोई धंधा छोटा नहीं होता’* Bigg Boss 10:सनी लिओनीसह 'लैला' गाण्यावर थिरकणार सलमान खान -शाहरूख खान