Join us

सनी लियोन, सलमान मोबाईलवर लोकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 00:29 IST

बॉलिवूडस्टार सलमान खान आणि अभिनेत्रीच्या रूपातील मदनिका सनी लियोन उत्तर प्रदेशातील मोबाईलधारकांत भलतेच लोकप्रिय आहेत.या दोन्ही स्टार्सना यूपीतील ...

बॉलिवूडस्टार सलमान खान आणि अभिनेत्रीच्या रूपातील मदनिका सनी लियोन उत्तर प्रदेशातील मोबाईलधारकांत भलतेच लोकप्रिय आहेत. या दोन्ही स्टार्सना यूपीतील मोबाईलधारक सर्वाधिक सर्च करून त्यांचे फोटो व व्हिडीओ मोबाईलमध्ये डाऊनलोड करीत आहेत. 2015 मध्ये टेलिनॉर इंडियाने 12 लाख मोबाईलधारकांचा सर्व्हे केला. त्यात ही बाब उघड झाली आहे.सल्लुमिया व सनी लियोननंतर अभिनेत्यांत शाहरुख, अक्षयकुमार, रणबीर व रणवीर सिंग यांचा क्रमांक लागतो. तर अभिनेत्रींत दीपिका पदुकोन, आलिया भट्ट, कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा यांचे नाव आहे, अशी माहिती टेलिनॉरच्या यूपी ईस्टचे बिझनेस हेड के.सी. नरेंद्रन यांनी दिली.