Join us

ब्लू बिकिनी घालून पूलमध्ये एन्जॉय करताना दिसली सनी लिओनी, पाहा बोल्ड फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 17:17 IST

Sunny leone shares her photo in blue bikini :आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या  सिनेमांपेक्षा जास्त तिच्या फोटो आणि व्हिडिओंना घेऊन चर्चेत असते.  सनी लिओनीचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. सनीच्या फोटोना  सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत असून  तिने निळ्या रंगाच्या बिकिनीमधील स्वत: चा आणखी एक स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ब्लू बिकिनीमध्ये शेअर केलेल्या या फोटोसह सनी आपल्या चाहत्यांना तिच्या नावाची आठवण करून दिली आगे. 'जर कोणी माझे नाव विसरले असेल तर ते माझ्या टोपीवर लिहिले आहे.' असे कॅप्शन सनीने या फोटोला दिलेले आहे. फोटोत सनी लिओनीने आपल्या चेहऱ्यावर टोपी ठेवली आहे ज्यावर तिचे नाव लिहिलेले आहे. 

काही दिवसांपासून सनी लियोनी आपला पुढील सिनेमाच्या शूटिंगसाठी कुटुंबासमवेत केरळमध्ये आहे.  तिने केरळमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ आपल्या पतीसह शेअर केले आहेत.  सनी लियोनी विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘अनामिका’ सिनेमात काम करते आहे. सनीने 'जिस्म २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. 'बिग बॉसच्या ५ व्या' सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच कार्यक्रमामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली आणि तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले.

 

टॅग्स :सनी लिओनी