Join us

​सनी लिओनीने असा घेतला मस्करीचा बदला! हा व्हिडिओ तुम्ही पाहायलाचं हवा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 14:09 IST

मस्करी करणा-या या टीम मेंबरसोबत सनीने काय केले, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास, तिचा हा दुसरा व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच हवा.

कालचं अभिनेत्री सनी लिओनीचा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवला होता. सनीच्या एका टीम मेंबरला सनीची मस्करी करण्याची हुक्की आली अन् त्याने चक्क एक साप सनीच्या अंगावर सोडला. ध्यानीमनी नसताना अंगावर साप पाहून सनी जाम घाबरली होती.  हा व्हिडिओ पाहून आम्ही पोट धरून हसलोतं. तुम्हीही हा व्हिडिओ पाहिला असेल तर साप बघून सनीला फुटलेला घाम तुम्ही बघितला असेलच.  याच व्हिडिओच्या शेवटी मस्करी करणा-या टीम मेंबरच्यामागे सनी धूम धावत सुटलेली तुम्हाला दिसली असेल. सनीने मस्करी करणा-या या टीम मेंबरसोबत काय केले, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास,   तिचा हा दुसरा व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच हवा. होय, सनीने तिच्यासोबतच्या मस्करीचा चांगलाच बदला घेतला.   बदला घेतानाचा व्हिडिओसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘माझा बदला! माझ्याशी केलेली मस्करी तुम्हाला महागात पडू शकते,’ अशा कॅप्शनसह सनीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सनीच्या दोन्ही हातात केक आहे. सनी हळूच मागून येते आणि  तिच्यावर साप सोडणाºया व्यक्तीच्या  दोन्ही गालांवर केक लावून पळून जाते, असा हा व्हिडिओ आहे.  हा व्हिडिओ सुद्धा तितकाच मजेशीर आहे, हे सांगणे नकोच.ALSO READ : अन् साप पाहून सनी लिओनीची उडाली घाबरगुंडी!  सनीचा राजीव वालिया दिग्दर्शित ‘तेरा इंतजार’ हा चित्रपट १ डिसेंबरला नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा ‘टार्जन द वंडर कार’शी मिळती जुळती असल्याचे सांगितले जाते. सनी अरबाजवर प्रचंड प्रेम करत असते. पण काही लोक अरबाजची हत्या करतात आणि सनीला त्रास देणे सुरु करतात. यानंतर अरबाजची आत्मा सनी लिओनीला सोबत करते आणि सगळ्यांचा सूड घेते, अशी कथा यात पाहायला मिळणार आहे. a