Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिओनीवर लागला फसवणुकीचा आरोप, अभिनेत्रीकडून आली यावर पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 12:12 IST

इव्हेंट कोऑर्डिनेटर आर.शियास यांनी सनी लिओनीवर २९ लाख रुपये लाटल्याचा आरोप केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने तिच्यावर लावण्यात आलेला फसवणुकीचा आरोप फेटाळून लावला आहे. सनी म्हणते अर्धवट मिळालेली माहिती धोकादायक असते.  जो करार झाले होता त्याचे वेळेत पैसे दिले गेले नाहीत. गेल्या आठवड्यात तिरुअनंतपुरममधील एका खासगी रिसॉर्टमध्ये सनीची केरळ पोलिसांनी चौकशी केली होती. कोची येथील एका इव्हेंट मॅनेजरने सनीवर फसवणूक केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती आणि या संदर्भात अभिनेत्रीची चौकशी झाली.

पेरुमबवूरचे इव्हेंट कोऑर्डिनेटर आर.शियास यांनी सनी लिओनीवर २९ लाख रुपये लाटल्याचा आरोप केला आहे. सनीने २०१६ साली एकूण १२ इव्हेंटसाठी २९ लाख रुपये घेतले पण तिनं एकाही इव्हेंटला उपस्थिती लावली नाही, असा आरोप आर.शियास यांनी केलाय. शियास यांनी यासंबंधीचे सर्व पुरावे देखील क्राइम ब्रांचकडे सोपवले होते.

आता सनीने  इव्हेंटच्या आयोजकांवर चुकीची माहिती पसरवल्याचा केल्याचा आरोप केला आहे आणि तिला आशा आहे की यावर कायदा कारवाई करण्यात येईल.  

इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार सनी म्हणाली, "अर्धवट माहिती धोकादायक आहे. आयोजकांसाठी मी माझे शेड्यूल बरेच वेळा बदलले आहेत, मी त्यांना नम्रपणे समजून घेण्याचा प्रयत्न करते, परंतु कोणतीही तारीख त्यांच्याकडून निश्चित केली गेली नव्हती.'' जर आपण एखाद्या कलाकाराचा वेळ घेत असाल तर आपल्याला ते अगोदरच द्यावे लागेल, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ते केले नाही. "

सनी पुढे म्हणतो, "हे शक्य नाही की मी एखाद्याला तारीख दिली आहे आणि वेळेवर कार्यक्रमात पोहोचले नाही.  त्यांनी मला वेळेवर पैसे दिले नाहीत, कोणतीही तारीख फायनल केली नाही, त्यामुळे मी नाराज झाले होते कारण माझ्या काही दुसरे कमिटमेंट्स आहेत. ही एक कठीण वेळ आहे, जिथे आपण स्वतःला धोक्यात घालून काम करतो आहोत, जेणेकरून इंडस्ट्री पुन्हा येऊ शकेल.. मी तपास अधिकाऱ्यांना माझा जबाब दिला आहे आणि ते चौकशी करत आहेत."

टॅग्स :सनी लिओनी