Join us

पैशांसाठी बहिणीचे पोस्टर विकायचा सनी लिओनीचा भाऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 12:52 IST

सनी लिओनीचे आयुष्य कुणापासूनही लपून राहिलेले नाही.  पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री हा तिचा प्रवास सगळ्यांनाच ठाऊक आहे.

ठळक मुद्दे सनी लिओनी लवकरच ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात एक आयटम सॉन्ग करताना दिसणार आहे.

सनी लिओनीचे आयुष्य कुणापासूनही लपून राहिलेले नाही.  पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री हा तिचा प्रवास सगळ्यांनाच ठाऊक आहे. सनी स्वमर्जीने पॉर्न इंडस्ट्रीत आली होती. तिची एन्ट्री हिट झाली आणि सगळ्यांना मागे सोडून ती या इंडस्ट्रीची टॉप मोस्ट अ‍ॅक्ट्रेस बनली. याच काळात सनीचा भाऊ स्वत:च्या पॉकेटमनीसाठी सनीचे पोस्टर्स विकू लागला.

होय, सनीचा भाऊ संदीप वोहरा याने ‘मोस्टली सनी’ या सिनेमात स्वत: हा खुलासा केला आहे. ‘मी होस्टेलला राहायचो तेव्हा सनीचा ऑटोग्राफ केलेले पोस्टर माझ्या खोलीच्या भींतीवर लावायचो. सनीचा चाहता माझ्या खोलीत येताच त्याची पहिली नजर त्या पोस्टरवर पडायची. मी ते पोस्टर विकायचो आणि पॉकेटमनी मिळवायचो. एक पोस्टर विकले की, लगेच सनीचे दुसरे पोस्टर माझ्या खोलीत लागायचे. आज ती गोष्ट आठवली की, हसू येते,’ असे संदीपने यावेळी सांगितले.

सनी आणि तिचा भाऊ संदीप यांच्यात खूप चांगे बॉन्डिंग आहे. तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल पण सनीने तिचे नावही भावाच्या नावावरून चोरले आहे. संदीपला घरात सगळे सनी या नावाने बोलवतात. भावाच्या याच नावावरून सनीने सनी लिओनी असे नामकरण करून पॉर्न इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली होती. सनी लिओनी लवकरच ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात एक आयटम सॉन्ग करताना दिसणार आहे.

याशिवाय एका मल्याळम चित्रपटातही ती झळकणार आहे. ‘रंगीला’ या  चित्रपटातून ती मल्याळम चित्रपटसृष्टीत पर्दापण करतेय. ‘कोका कोला’नामक कॉमेडी चित्रपटातही सनीची वर्णी लागली आहे. याशिवाय आणखी एक काम सनीने हाती घेतले आहे. ते म्हणजे,बच्चेकंपनीसाठीची शाळा. होय, सनी व तिचा पती डेनियल वीबर लवकरच एक शाळा उघडणार आहेत.

टॅग्स :सनी लिओनी