Join us

विक्रम भट्ट यांच्या दिग्दर्शनाखाली सनी लिओनीने सुरु केलं शूटिंग, सोशल मीडियावर दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 19:30 IST

सनी लिओनीने सोमवारी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री सनी लिओनीने सोशल मीडियावर सांगितले आहे की तिने ‘अनामिका’ या नव्या प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. विक्रम भट्ट याचे दिग्दर्शन करीत आहेत. सनी लिओनी आणि विक्रम भट्ट प्रथमच एकत्र काम करत आहेत.

सोशल मीडियावर शेअर केलेली माहितीसनी लिओनीने सोमवारी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ती 'अनामिका'च्या सेटवर क्लिपबोर्ड पकडून उभी दिसतेय आणि दुसऱ्या फोटोत ती विक्रम भट्ट यांच्यासोबत दिसतेय. सनी लिओनीने आपल्या पोस्टसह लिहिले, 'सतनाम ... एक नवीन कामाची सुरुवात करतेय आणि माझे लॉकडाऊन संपतंय. विक्रम भट्टसोबत नव्या प्रवासाची ही सुरुवात आहे.

कोरोनामुळे देशात झालेल्या लॉकडाऊननंतर  सनी लिओनीचा हा पहिला प्रोजेक्ट आहे, ज्याची शूटिंग तिने सुरु केली आहे. 'अनामिका' चित्रपट आहे की  वेबसिरीज हे अद्याप स्पष्ट झालेल नाही. 

कोरोनामुळे सनी लिओन लास एंजेलिसमध्ये गेली होती कोरोना व्हायरसपासून मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सनी  मे महिन्यात आपल्या कुटूंबियांसह लास एंजेलिस येथे गेली होती. सनी लिओनी शेवटची नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अथिया शेट्टीसोबत 2019 मध्ये ‘मोतीचूर चकनाचूर’ चित्रपटात दिसली होती. या सिनेमात त्याने एक कॅमिओ केला होता.

टॅग्स :सनी लिओनी