या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास, सनीने आपल्या मुलाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी बरेचसे प्रोजेक्ट थांबवून ठेवले आहेत. हे सर्व प्रोजेक्ट सनीसाठी महत्त्वाचे असून, त्यामध्ये तो काम करण्यास उत्सुक आहे. परंतु मुलाला धडाक्यात लॉन्च करण्यासाठी त्याने हे सर्व प्रोजेक्ट होल्डवर ठेवले आहेत. वास्तविक सनी देओल या अगोदर कुठल्याच चित्रपटात एवढा बिझी राहिला नाही. परंतु मुलाच्या चित्रपटाबाबत तो अधिक गंभीर असल्याचे यानिमित्त दिसून येत आहे.}}}} ">The first audience #palpaldilkepaas#manali#film#shooting#happy#people#thankyoupic.twitter.com/ZVgXsLXwhI— Sunny Deol (@iamsunnydeol) July 1, 2017
सनी देओलच्या मुलाच्या चित्रपटाची शूटिंग बघण्यासाठी उसळली गर्दी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 21:02 IST
सध्या बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता सनी देओल याचा मुलगा करण सिंग देओल याच्या आगामी ‘पल पल दिल के पास’ या ...
सनी देओलच्या मुलाच्या चित्रपटाची शूटिंग बघण्यासाठी उसळली गर्दी!!
सध्या बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता सनी देओल याचा मुलगा करण सिंग देओल याच्या आगामी ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्याकरिता त्याने मनाली येथे मुक्काम ठोकला आहे. सध्या तो विविध लोकेशनवर चित्रपटाचे शूटिंग करीत आहे. चित्रपटाची शूटिंग अद्यापपर्यंत पूर्ण झाली नसली तरी, करणच्या चाहत्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. तो ज्याठिकाणी शूटिंगसाठी पोहोचतो तेथे त्याचे चाहते तुफान गर्दी करीत आहेत. सनीने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शूटिंग बघण्यासाठी गर्दी करीत असलेल्या लोकांचे काही फोटोज् पोस्ट केले आहेत. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की, बॉलिवूडच्या या अॅक्शन अभिनेत्याच्या मुलाचाही बॉलिवूडमध्ये जलवा असेल, हे नक्की. सनी देओलचा मुलगा करण देओल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. हा चित्रपट एक रोमॅण्टिक ड्रामा असून, सनी देओल स्वत:च चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे. या अगोदर सनीने ‘दिल्लगी’ आणि ‘घायल रिर्टन्स’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सनीच्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे करण देओलच्या चित्रपटालाही असाच काहीसा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून देओल परिवाराची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. ज्यामुळे लोकांमध्ये करणच्या या चित्रपटावरून उत्साह असल्याचे बघावयास मिळते.