Join us  

देओल कुटुंबातील महिला प्रसिद्धीझोतात का येत नाहीत? सनी देओलने स्पष्टच सांगितलं; 'निर्णय घेण्याचं...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 10:50 AM

देओल कुटुंबातील महिला कॅमेऱ्यासमोर का येत नाहीत याचा खुलासा स्वत: सनी देओलने केला आहे.

'घायल', 'गदर एक प्रेम कथा' सारख्या सुपरहिट सिनेमांतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता सनी देओल (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) मधून पुन्हा धुमाकूळ घालणार आहे. वडील धर्मेंद्र जे बॉलिवूडमधील सर्वात हँडसम अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सनीनेही बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. त्याच्यापाठोपाठ त्याचा भाऊ बॉबी देओलनेही सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण धर्मेंद्र आणि दोन्ही मुलांच्या पत्नींविषयी कोणालाच फार माहिती नाही. त्यांच्या पत्नी या लाइमलाईटपासून दूरच आहेत. देओल कुटुंबातील महिला कॅमेऱ्यासमोर का येत नाहीत याचा खुलासा स्वत: सनी देओलने केला आहे.

2013 साली एका मुलाखतीत सनी देओलला प्रश्न विचारण्यात आला की देओल कुटुंबातील महिला प्रसिद्धीझोतात का येत नाहीत? यावर सनी देओल म्हणाला, 'माझी आई आणि पत्नीला आम्ही प्रसिद्धीझोतापासून दूर ठेवलेलं नाही. माझ्या पत्नीची वेगळी ओळख आहे तिचं वेगळं व्यक्तिमत्व आहे. तिला तिचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. कॅमेऱ्यासमोर न येणं हा त्यांचाच निर्णय आहे. ना माझ्या वडिलांनी आणि नाही मी घरातील महिलांवर कोणच्याही प्रकारचा दबाव कधीच टाकलेला नाही.'

सनी देओलने या उत्तरावर सर्वांचंच मन जिंकलं. सनी देओल पत्वी पूजा देओल मूळची लंडनची आहे. तिचं खरं नाव लिंडा असं आहे. ती कायम प्रसिद्धीझोतापासून दूर राहणंच पसंत करते. 1984 मध्ये सनी देओलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि काही वर्षातच त्याने पूजाशी लग्न केले.  दोघांनी टिपीकल पंजाबी रितीरिवाजात लग्न केलं. मात्र हे लग्न बराच काळ सिक्रेट ठेवलं गेलं. सनीची पत्नी पूजा देओल लेखिका आहे. 'यमला पगला दिवाना'सिनेमाच्या पटकथेमध्ये तिचाही सहभाग होता हे खूप कमी जणांना माहित आहे. दोघांना करण आणि राजवीर ही दोन मुलं आहेत. करण देओल नुकतंच द्रिशा आचार्यसोबत लग्नबंधनात अडकला. 

2001 साली आलेल्या 'गदर' च्या यशानंतर आता २२ वर्षांनंतर 'गदर 2' प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सनी देओल तारा सिंगच्या भूमिकेत धुमाकूळ घालायला सज्ज आहे. तर तारा सिंग आणि सकीनाची लव्हस्टोरी बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा बघायला मिळणार आहे. 

टॅग्स :धमेंद्रसनी देओलहेमा मालिनीबॉलिवूडपरिवार