Join us

सनी देओल 'डर' सिनेमानंतर तब्बल 16 वर्षे शाहरुख खानशी बोलला नव्हता, कारण वाचून व्हाल हैराण

By गीतांजली | Updated: October 19, 2020 13:08 IST

सनी दिओलने आपल्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेता सनी दिओल आज आपला 64 वा वाढदिवस साजरा करतोय. सनी दिओलने आपल्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला सनी दिओलशी निगडीत एक किस्सा सांगणार आहोत, जो डर सिनेमाशी संबंधीत आहे.  'डर' सिनेमानंतर बऱ्याच काळ सनी देओलशाहरुख खानशी  बोलला नव्हता. 'डर'नंतर सनी देओल 16 वर्षे शाहरुख खानशी बोलत नव्हता. ऐवढंच नाही तर त्यानंतर सनीने कधीच यशराजच्या सिनेमातदेखील काम केले नाही. एका चॅट शो दरम्यान सनीने हा पुन्हा एकदा खुलासा केला आहे.  

सनी देओल 16 वर्षे शाहरुख खानशी बोलला नव्हता नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सनीला जेव्हा विचारण्यात आले की, सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्याच्याबाबत इतरांच्या मनात भिती निर्माण झाली होती का ?, यावर तो म्हणाला, त्यांच्याच मनात काहीतरी कटूता राहिली असेल. ज्यामुळे त्यांच्या मनात भिती होती. त्यानंतर सनीला तू 'डर'नंतर 16 वर्षे शाहरुखशी बोलला नाहीस का असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांने होकारार्थी उत्तर दिले.

या भांडणामागचे कारण सांगताना सनी म्हणाला, शेवटी सिनेमात लोकांनी मला पसंत केले. शाहरुखला सुद्धा केलं. सिनेमाला घेऊन मला फक्त ऐवढीच अडचण होती की मला माहिती नव्हते यात व्हिलनची भूमिकासुद्धा इतकी महत्त्वाची आहे. मी सिनेमात नेहमी स्वच्छंद मनाने आणि लोकांवर विश्वास ठेवून काम करतो. मात्र सगळेच कलाकार तसं करत नाहीत.  कदाचित त्यांना स्टारडम हवी असते. रिपोर्टनुसार सनीने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तो यश चोप्रा यांच्यासोबत काम करणार नाही कधी. सनीचे म्हणणे होते की, यश चोप्राने त्याला धोका दिला होता. 

टॅग्स :सनी देओलशाहरुख खान