Join us
Daily Top 2Weekly Top 5

-म्हणून सनी देओलने जगापासून लपवली होती लग्नाची गोष्ट; अमृताला सुद्धा ठेवले होते अंधारात

By रूपाली मुधोळकर | Updated: October 19, 2020 12:08 IST

सनी देओल अनेकदा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. पण पत्नी पूजा देओल हिचा फोटो मात्र चुकूनही त्याच्या सोशल अकाऊंटवर दिसत नाही.

ठळक मुद्देअमृतासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सनीच्या आयुष्यात आली ती डिम्पल कपाडिया.

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सनी देओल याचा आज 64 वा वाढदिवस. 19  ऑक्टोबर 1956 रोजी जन्मलेला सनी देओल पडद्यावर अनेक ‘अँग्री’ भूमिका साकारल्या. पण खºया आयुष्यात सनी अतिशय सौम्य आणि काहीशा लाज-या स्वभावाचा आहे. त्याच्या करिअरबद्दल तर सगळ्यांना ठाऊक आहे. पण त्याची पत्नी व मुलांबद्दल फार कमी लोक जाणतात.

सनी देओल अनेकदा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. पण पत्नी पूजा देओल हिचा फोटो मात्र चुकूनही त्याच्या सोशल अकाऊंटवर दिसत नाही. अनेक हिट सिनेमे देणा-या सनीने 36 वर्षांपूर्वी लंडनमध्ये पूजासोबत गुपचूप लग्नगाठ बांधनी होती.

 बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याआधीच सनीने पूजासोबत लग्न केले होते. हे साल होते 1984. पण सनी आणि पूजा यांचे लग्न अनेक वर्षे जगापासून लपवून ठेवण्यात आले. पुढे सनीच्या लग्नाचे फोटो युकेच्या एका मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेत आणि या लग्नाबद्दल जगाला कळले. अर्थात यानंतरही आजपर्यंत कधीच सनी व पूजा यांना पब्लिकली एकत्र पाहिले गेले नाही.

पूजा व सनीचे लग्न मुळातच बिझनेस अ‍ॅग्रीमेंट होते. ‘बेताब’ रिलीज होण्याआधी सनीच्या लग्नाबद्दल कोणालाही कळता कामा नये, यासाठी हा आटापीटा होता. लग्नाची गोष्ट बाहेर आली तर सनीच्या रोमॅन्टिक इमेजवर निगेटीव्ह परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे ‘बेताब’ रिलीज होईपर्यंत पूजा लंडनमध्येच राहिली. तिचा भेटायला सनी लपूनछपून अनेकदा लंडनला जायचा. पुढे एका मॅगझिनने या लग्नाची बातमी जगापुढे आणलीच. मात्र तरीही सनीने लग्न झाल्याचा इन्कार केला होता.

अमृता सिंगपासूनही लपवली होती लग्नाची गोष्टसनीचे लग्न झाले असूनही तो अमृता सिंगच्या प्रेमात पडला होता. अभिनेत्री अमृताचे सनीवर खूप प्रेम होते. पण सनी मात्र पूर्ण जगासमोर हे नाते  मान्य करण्यास तयार नव्हता.  याचदरम्यान अमृताने सनीची बाहेरून चौकशी करण्यास सुरूवात केली आणि सनीचे लंडनमध्ये राहणा-या पूजा नावाच्या मुलीसोबत  अफेअर असल्याचे तिला कळले. अर्थात अमृता सनीच्या प्रेमात इतकी वेडी होती. सुरूवातीला सनी व पूजाच्या नात्यांवर ती विश्वास ठेवायला तयार नव्हती. 

सनी कामाच्या निमित्ताने नेहमी लंडनला जात असे. एवढेच अमृताला माहित होते. पण पुढे सनी व पूजाचे केवळ अफेअर नाही तर दोघांचेही लग्न झाले आहे, हे अमृताला कळले. सनीने लग्नाची गोष्ट अख्ख्या जगापासून लपवून ठेवली होती. पण  एक ना एक दिवस सत्य बाहेर येतेच. अखेर सनीच्या लग्नाची बातमी पेपरमध्ये झळकली. पण तरीही सनी लग्न झाले ही गोष्ट मान्य करण्यास तयार नव्हता. अर्थात तोपर्यंत सनी आणि अमृता यांचे नाते  संपुष्टात आले होते. 

अमृतानंतर डिंपलची एन्ट्री

अमृतासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सनीच्या आयुष्यात आली ती डिम्पल कपाडिया. दोघांनीही अनेक हिट चित्रपट दिलेत. 1984 मध्ये ‘मंजिल-मंजिल’ या चित्रपटात ही जोडी झळकली. ती इतकी हिट झाली की, या जोडीला साईन करण्यासाठी दिग्दर्शकांमध्ये जणू स्पर्धा लागली. त्यामुळे अर्जुन, आग का गोला, नरसिम्हा, गुनाह अशा अनेक चित्रपटात सा जोडीने एकत्र काम केले. चित्रपटात एकमेकांसोबत रोमान्स करता करता ही जोडी रिअल लाईफमध्येही रोमान्स करू लागली. सनी देओल विवाहित होता. पण तोही डिम्पलच्या प्रेमात पडला होता. त्याकाळात डिम्पल राजेश खन्ना यांच्यापासून वेगळी राहत होती. सनी व डिम्पलची प्रेमकहाणी तब्बल 11 वर्षे चालली. या दोघांनी गुपचूप लग्न केले, अशाही बातम्या त्यावेळी आल्यात. अर्थात सनी व डिम्पल यांनी कधीही हे मान्य केले नाही.

तब्बल 16 वर्षे शाहरुख खानशी बोलला नव्हता सनी देओल, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

टॅग्स :सनी देओल