Join us

​‘संडे दर्शन’ अन् अमिताभ बच्चन यांचा ‘तो’ खास चाहता...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 13:53 IST

अमिताभ बच्चन दर रविवारी आपल्या चाहत्यांना भेटतात. हेच कारण आहे की, अमिताभ यांची एक झलक पाहायला मिळावी म्हणून दर ...

अमिताभ बच्चन दर रविवारी आपल्या चाहत्यांना भेटतात. हेच कारण आहे की, अमिताभ यांची एक झलक पाहायला मिळावी म्हणून दर रविवारी हजारो चाहते ‘जलसा’ समोर ताटकळत उभे असतात. गत रविवारी सुद्धा यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. हजारो चाहत्यांनी अमिताभ यांना भेटण्यासाठी ‘जलसा’ बाहेर गर्दी केली होती आणि याचदरम्यान ‘जलसा’चे दरवाजे उघडले अन् पांढरा सदरा आणि त्यावर ग्रे रंगाची शाल अशा रूबाबदार पोशाखात अमिताभ चाहत्यांना भेटण्यासाठी बाहेर आलेत. त्यांनी चाहत्यांना हात हलवून अभिवादन केले. पण याचदरम्यान अमिताभ यांचे लक्ष गर्दीतील एका चाहत्याकडे गेले आणि त्यांनी लगेच आपल्या सिक्युरिटी गार्ड्सला त्या चाहत्याला आत घेऊन येण्यास सांगितले. हा चाहता होता, फुटपाथवर राहणारा एक दिव्यांग मुलगा.तो दिव्यांग चाहता आत येताच, अमिताभ यांनी त्याचे हसत स्वागत केले, त्याच्याशी गप्पा मारल्यात आणि नंतर एक छोटीशी भेट देऊन त्याचा निरोप घेतला. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर या चाहत्याबद्दल लिहिले आहे.ALSO READ : शेकडोंच्या गर्दीतून रस्ता काढत ‘जलसा’त शिरली चिमुकली चाहती! बिग बींनी शेअर केलेत फोटो!!‘नेहमीप्रमाणे यंदाचा रविवारही खास होता. यावेळी बरेच काही खास होते. गर्दीत माझा एक दिव्यांग चाहता होता. मी त्याला आत बोलवले.  त्याच्या चेहºयावरचा आनंद पाहण्यासारखा होता. तुला काय हवे, असे मी त्याला विचारले. तर त्याने माझ्या टी-शर्टकडे बोट दाखवले. मी त्याला माझे अनेक टी-शर्ट   दिलेत. चालण्यासाठी हातांचा वापर करणाºया या चाहत्याला घरी पोहोचवण्याची व्यवस्थाही केली. त्याच्याकडे कुठलेही घर नाही. तो फुटपाथवर राहतो, हे मला नंतर माझ्या टीमकडून  कळले...,’असे अमिताभ यांनी लिहिले आहे.यापूर्वी अमिताभ यांनी अशाच एका चिमुकल्या चाहतीसोबतचे फोटो शेअर केले होते. अमिताभ अभिवादन करण्यासाठी ‘जलसा’बाहेर येताच ही चिमुकली चाहती गर्दीतून रस्ता काढत थेट अमिताभ यांच्या पुढ्यात उभी झाली होती.