Join us
Daily Top 2Weekly Top 5

केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या रिलेशनशीपवर सुनील शेट्टीने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 12:39 IST

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू केएल राहुल आणि गर्लफ्रेन्ड अथिया शेट्टी यांच्या रिलेशनशीपचा चर्चा सातत्याने ऐकायला मिळतात.

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू  केएल राहुल आणि गर्लफ्रेन्ड अथिया शेट्टी यांच्या रिलेशनशीपचा चर्चा सातत्याने ऐकायला मिळतात. अनेक इव्हेंटमध्ये आणि पार्ट्यांमध्ये राहुल आणि अथिया एकत्र दिसतात. इतकेच नाही तर मैदानावर राहुलला प्रोत्साहन देण्यासाठी आथिया त्याच्यासोबत तिथे उपस्थित असते. 

केएल राहुल आणि अथिया दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. पण अद्याप त्यांनी त्यांच्या नात्याची अद्याप कबूली दिलेली नाही. दरम्यान त्या दोघांनी रिलेशनशीपची कबूली दिलेली नसली तरी त्यांच्या नात्याबाबतचा मोठा खुलासा नुकताच अभिनेता सुनील शेट्टीने केला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, सुनील शेट्टीने आथिया आणि राहुलच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.  तो म्हणाला की, अद्याप गोष्टी स्वीकारल्या नाहीत.

पण जेव्हा अथिया आणि राहुल ब्रँडच्या 'ब्रँड अंबेसडर' होण्यावर सुनील शेट्टीला विचारले असता, त्याने सांगितले की, 'जाहिरातीबद्दल बोलायचे झाले तर, एका आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी दोघांची निवड करण्यात आली आहे.'

सुनील शेट्टीने पुढे सांगितले की, 'दोघे गुड लुकिंग जोडपे आहे आणि ब्रॅण्डच्या दृष्टीकोनातून पाहायचे झाले तर दोघे चांगले काम करत आहेत. मला असे म्हणावे लागेल की, दोघेही एकमेकांसोबत जाहिरातीत चांगले दिसतात. ' सुनीलच्या या म्हणण्यावरून त्याला आथिया आणि राहुलची जोडी आवडते असे म्हणायला हरकत नाही. 

टॅग्स :सुनील शेट्टीअथिया शेट्टी लोकेश राहुल