भारत-पाकिस्तान युद्धाची कथा सांगणारा सुपरहिट सिनेमा म्हणजे जे.पी. दत्ता यांचा बॉर्डर. हा सिनेमा रिलीज होऊन जवळपास २९ वर्ष उलटली आहेत. मात्र, आजही या सिनेमाची लोकप्रियता टिकून आहे. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. यातलाच एक अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी (Suniel Shetty). या सिनेमात सुनीलने अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या सिनेमाचं शूट सुरु असतांना सुनीलची लेक तापाने फणफणली होती. मात्र, तरीसुद्धा त्याने चित्रीकरण पूर्ण केलं.
१९९७ च्या काळात सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा सुनील शेट्टीच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. या सिनेमामुळे त्याच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. विशेष म्हणजे या लोकप्रियतेमागे सुनीलची मेहनतदेखील आहे. या सिनेमासाठी त्याने बरेच कष्ट केले. वेळप्रसंगी त्याचं घराकडेही दुर्लक्ष झालं. एका मुलाखतीमध्ये सुनीलने या सिनेमाच्या शुटिंगचा एक किस्सा सांगितला. हा किस्सा सांगतांना तो भावुक झाला होता.
'बॉर्डर'मधील सुनील शेट्टी आणि अभिनेत्री शरबानी मुखर्जी यांच्यावर चित्रीत झालं होतं. ज्यावेळी या गाण्याचं शुटिंग होतं. त्याचवेळी सुनीलची लेक आजारी पडली होती. मात्र, अशाही परिस्थितीत त्याला हे गाणं शूट करावं लागलं होतं.
''या गाण्यात सुहागरातचा सीन होता. मुळात 'सुहागरात' बद्दल ऐकल्यानंतर, मी खूप टेन्शमध्ये आलो होतो. आपण ते गाणं कसं शूट करायचं?असा प्रश्न मला पडला होता. पण, जेव्हा जे.पी दत्ताजींनी हे गाणं ऐकवलं तेव्हा मला स्पष्टपणे कळलं की फक्त एकच व्यक्ती हे गाणं अशा प्रकारे शूट करू शकते. आणि जे.पी.जींनी ते गाणं खूपच सुंदरित्या शूट केलं होतं'', असं सुनील म्हणाला.
पुढे तो म्हणतो, ''ज्यावेळी 'तो चलॅूं' या गाण्याचं शूट सुरु होतं. त्याचवेळी आथियाला खूप ताप आला होता. त्यावेळी ती खूप लहान होती. अशा परिस्थितीत तिला सेटवर ठेवणं कठीण होतं. त्यामुळे मी तिला घरी पाठवायचा निर्णय घेतला. मधल्या वेळात मी सतत तिच्या संपर्कात होतो. मात्र, अंगात खूप ताप असल्यामुळे मुंबईऐवजी ती दिल्लीला पोहोचली होती. ती रात्र मी कधीच विसरु शकणार नाही. जोपर्यंत तिच्या तब्येतीविषयीचे अपडेट आम्हाला मिळत नव्हते तोपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता. त्यानंतर ती सुखरुप घरी पोहोचली आणि मग माझं टेन्शन कमी झालं.'' दरम्यान, बॉर्डर या सिनेमात सुनील शेट्टीने मेजर भैरवसिंह राठौड ही भूमिका साकारली होती. तर, अभिनेत्री शरबानी मुखर्जी हिने त्याच्या पत्नीची भूमिका वठवली होती.
Web Summary : Suniel Shetty recounts filming 'Border' while his daughter was severely ill. He recalls a tense night during the shoot of the song 'To Chalun' when his daughter Athiya developed a high fever and had to be sent home, causing him immense worry until she safely reached Delhi.
Web Summary : सुनील शेट्टी ने 'बॉर्डर' की शूटिंग को याद किया जब उनकी बेटी गंभीर रूप से बीमार थी। उन्होंने 'तो चलूँ' गाने की शूटिंग के दौरान एक तनावपूर्ण रात को याद किया जब उनकी बेटी अथिया को तेज बुखार हो गया और उसे घर भेजना पड़ा, जिससे उन्हें बहुत चिंता हुई जब तक कि वह सुरक्षित रूप से दिल्ली नहीं पहुँच गई।