Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुनील शेट्टीच्या 'हंटर' सिरीज या दिवशी होणार रिलीज, टीझर शेअर करताना अभिनेता म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 19:00 IST

सुनील शेट्टी सध्या 'हेरा फेरी ३'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. दरम्यान अभिनेत्याने त्याच्या 'हंटर: टुटेगा नही तोडेगा' या नव्या सिरिजची घोषणा केली आहे.

हिंदी सिनेमातील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'हेरा फेरी'. सुनील शेट्टी सध्या  'हेरा फेरी ३'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. दरम्यान सुनीलने त्याची नवीन अ‍ॅक्शनपॅक मालिका 'हंटर: टुटेगा नही तोडेगा'ची घोषणा केली आहे. यात त्याच्यासोबत ईशा देओल, राहुल देव आणि बरखा बिश्ता देखील दिसणार आहेत. शुक्रवारी निर्मात्यांनी मालिकेचा टीझर रिलीज केला, ज्यामध्ये सुनील जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत आहे.

त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर टीझर शेअर करताना सुनीलने लिहिले, 'एसीपी विक्रम को रोकना है तो ठोकना पडेगा.'सुनीलची नवीन मालिका 'हंटर: टूटेगा नहीं तोडेगा' 22 मार्च रोजी Amazon Mini TV वर लॉन्च होणार आहे, ज्याचा प्रत्येकजण विनामूल्य आनंद घेऊ शकतो. या मालिकेचा ट्रेलर १४ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. सुनील शेवटचा 'धारावी बँक' या वेबसीरिजमध्ये दिसला होता.

या शोची घोषणा करताना सुनील शेट्टी म्हणाला, “अ‍ॅक्शन या प्रकाराविषयी मला कायमच पॅशन वाटत आले आहे आणि हंटर टुटेगा नही तोडेगा या सीरिजच्या निमित्ताने मला ते पॅशन पुन्हा एकदा जगता येत आहे. एसीपी विक्रम सिन्हा या व्यक्तिरेखेने सुरुवातीपासूनच मला खिळवून ठेवले. तो वन मॅन आर्मी आहे. एकदम बिनधास्त आणि धाडसी.”

अ‍ॅक्शन-ड्रामा सीरिज ‘हंटर टुटेगा नही तोडेगा या सीरिजचा प्रीमिअर 22 मार्च 2023 रोजी फक्त अ‍ॅमेझॉन मिनी टीव्हीवर होणार आहे.  

टॅग्स :सुनील शेट्टी