Join us

वय वर्षे ५६; पण ‘या’ अभिनेत्याचे पिळदार शरीर बघून रणबीर, रणवीरलाही वाटेल हेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 20:03 IST

फिटनेसच्या बाबतीत नव्या पिढीच्या अनेक कलाकारांची एकमेकांशी स्पर्धा सुरु असते. पण आता नव्या पिढीतल्या कलाकारांना त्यांचाच एक सीनिअर अभिनेता जोरदार टक्कर देताना दिसतोय. 

बॉलिवूडची नवी पिढी आपल्या दमदार अभिनयासोबत फिटनेससाठीही चर्चेत असते. म्हणूनच प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटीच्या सोशल अकाऊंटवर काही दिसो ना दिसो, एक गोष्ट मात्र आवर्जुन दिसते, ती म्हणजे, जिममध्ये वर्कआऊट करतानाचे फोटो अन् व्हिडिओ. फिटनेसच्या बाबतीत नव्या पिढीच्या अनेक कलाकारांची एकमेकांशी स्पर्धा सुरु असते. पण आता नव्या पिढीतल्या कलाकारांना त्यांचाच एक सीनिअर अभिनेता जोरदार टक्कर देताना दिसतोय. या सीनिअर अभिनेत्याचे वय आहे, ५६ वर्षे. पण त्याचे सिक्स पॅक अ‍ॅब्स आणि पिळदार शरीर बघून तुम्हीही अचंबित व्हाल. होय, या अभिनेत्याचे नाव आहे, सुनील शेट्टी.

 सुनील शेट्टीच्या सोशल मीडियावर एकदा नजर टाकली की, तुम्हाला त्याचे फिटनेस प्रेम लक्षात येईल. खरे तर सुनील शेट्टी, संजय दत्त, सनी देओल या अभिनेत्यांनीच बॉलिवूडमध्ये बॉडी बनवण्याचा ट्रेंड आणला, असे म्हटले तर खोटे होणार नाही. आज तोच ट्रेंड बॉलिवूडचा प्रत्येक नवा अभिनेता फॉलो करताना दिसत आहेत.

अलीकडे झालेल्या ‘मिशन फिट इंडिया’ या फिटनेस फेस्टिवलमध्ये सुनील सहभागी झाला होता. यावेळी फिटनेस या शब्दाचे व्यावयायिकरण होत असल्याचे तो म्हणाला होता..

 फिट राहण्याच्या नावावर लोकांना लुबाडले जात आहे, वजन कमी करण्यासाठी लोकांच्या मनावर चुकीच्या गोष्टी बिंबवल्या जात आहेत, असे तो म्हणाला होता. फिट राहण्यासाठी एक पैसाही खर्च करण्याची गरज नाही. घरी राहून केवळ संतुलित आहाराच्या जोरावर तुम्ही स्वत:ला फिट ठेवू शकता, असेही तो म्हणाला होता.

सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी हिला आपण बॉलिवूडमध्ये पाहिले आहे. लवकरच सुनीलचा मुलगा अहान हाही बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशी चर्चा आहे. वडिलांप्रमाणे अथिया व अहान हे दोघेही फिटनेस फ्रीक आहेत.

 

टॅग्स :सुनील शेट्टी