Join us

या अभिनेत्याची पहिली पत्नी होती सलमानची एक्स तर दुसरी पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 14:39 IST

सुमीत चित्रपटात काम करत नसला तरी कधी तरी फिल्मी पार्टींंमध्ये त्याच्या पत्नीसोबत हजेरी लावतो.

ठळक मुद्देसुमीतने 1995 पर्यंत 30 तरी चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यानंतर सुमीत चित्रपटसृष्टीपासून दूर गेला. तो चित्रपटात काम करत नसला तरी कधी तरी फिल्मी पार्टींंमध्ये त्याच्या पत्नीसोबत हजेरी लावतो. त्याची पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाज आहे.

सुमीत सहगलने त्याच्या करियरच्या सुरुवातीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. इंसानियत के दुश्मन या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या फिल्मी करियरला सुरुवात केली. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, गोविंदा सारखे स्टार होते. पण तरीही सुमीतची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. त्यानंतर सुमीतला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. त्याने परम धर्म, इमानदार, लष्कर, पती पत्नी और तवायफ, गुनाह यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. स्वर्ग जैसा घर, शानदार, साजन की बाहो में, सौदा यांसारख्या अनेक चित्रपटांमधील त्याच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

सुमीतने 1995 पर्यंत 30 तरी चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यानंतर सुमीत चित्रपटसृष्टीपासून दूर गेला. तो चित्रपटात काम करत नसला तरी कधी तरी फिल्मी पार्टींंमध्ये त्याच्या पत्नीसोबत हजेरी लावतो. त्याची पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाज आहे. फराहने नव्वदीच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गोविंदासोबतची तिची जोडी तर विशेष गाजली होती. ती प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण आहे. फराहचे पहिले लग्न दारा सिंग यांचा मुलगा विंदू दारा सिंगसोबत झाले होते. पण काहीच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा असून तो फराह सोबत राहातो. विंदूसोबत घटस्फोट झाल्यानंतर फराहची सुमीतसोबत ओळख झाली आणि त्यांनी काहीच महिन्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला.

फराह आणि सुमीत त्यांच्या संसारात खूश असून सुमीतचे देखील हे दुसरे लग्न आहे. त्याचे पहिले लग्न सायरा बानू यांची भाची अभिनेत्री शाहीन बानूसोबत झाले होते. शाहीन ही अभिनेता सलमान खानची पहिली प्रेयसी होती.

टॅग्स :बॉलिवूड