Join us

​दिवाळीला घरी आलेल्या सुहाना खानची धम्माल मस्ती; मैत्रिणींसोबत निघाली ‘मुव्ही डेट’वर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 13:04 IST

शाहरूख खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चित स्टार डॉटर्सपैकी एक आहे. लंडनमध्ये शिकत असलेली सुहाना दिवाळीच्या सुट्टींसाठी मुंबईत ...

शाहरूख खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चित स्टार डॉटर्सपैकी एक आहे. लंडनमध्ये शिकत असलेली सुहाना दिवाळीच्या सुट्टींसाठी मुंबईत आली आहे. आता सुट्टी म्हटल्यानंतर धम्माल तर होणारच. शनिवारी रात्री सुहानाने अशीच धम्माल केली. आपल्या काही मैत्रिणींसोबत तिने मुव्ही डेट एन्जॉय केली. दिवाळीच्या मुहूर्तावर आमिर खानचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ आणि अजय देवगणचा ‘गोलमाल अगेन’ रिलीज झालाय. पण या दोन चित्रपटांपैकी सुहानाने आमिरच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ला पसंती दिली.चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूर व सुहाना या तिघींनी एकत्र ‘सीक्रेट सुपरस्टार’ पाहिला. यावेळी सुहाना व्हाईट स्लीव्हलेस टॉप आणि डेनिस अशा लूकमध्ये दिसली. शनाया ब्लॅक टॉप आणि मिल्ट्री प्रिंटेड जीन्समध्ये दिसली. तर अनन्या कपूर मिल्ट्री प्रिंटेड जॅकेट, व्हाईट टाूप आणि शॉर्ट्समध्ये दिसली.मुंबईच्या धीरूबाई अंबानी स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी सुहानाने लंडनची निवड केली आहे. सुहानाचा भाऊ आर्यन खान हा सुद्धा सध्या लंडनमध्येच शिकतो आहे.  डान्सिंग आणि स्पोर्ट तिचे आवडीचे विषय. सुहानाने एक डान्सर म्हणून नाव कमवावे, असे शाहरूखला वाटतेय. अर्थात सुहानाने अभिनय क्षेत्रात यावे, यालाही शाहरूखची ना नाहीय. तसेही सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा जोरात सुरु झाल्या आहेत. अलीकडे शाहरूखची लाडकी लेक सुहाना एक उत्तम अभिनेत्री बनणार, मोठे नाव कमावणार, असे भाकीत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी  यांनी वर्तवले होते. सुहानाला पप्पा किंग खानप्रमाणेच अभिनयात करिअर करायचे आहे. त्यासाठी ती तयारीही करीत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरूख खानने एका मुलाखतीत सुहानाला अभिनयात रस असल्याचे म्हटले होते. सध्या सुहाना शिकत आहे. शाहरूखच्या मते, सुहानाने अगोदर तिचे शिक्षण पूर्ण करावे, त्यानंतरच अभिनयाचा विचार करावा. सुहानादेखील त्याच दिशेने पाऊल टाकत आहे. सुहाना पप्पा शाहरूखची प्रचंड लाडकी आहे. ALSO READ: शाहरूख नाही, सुहानावर खिळल्या सर्वांच्या नजरा!शाहरूख व गौरी खान यांनी २५ आॅक्टोबर १९९१ मध्ये लग्न केले होते. १९९७ मध्ये या दोघांचा मोठा मुलगा आर्यन याचा जन्म झाला होता. यानंतर २०००मध्ये सुहाना जन्मली होती. सन २०१३ मध्ये शाहरूख व गौरीचा तिसरा  मुलगा अबराम याचा जन्म झाला होता. अर्थात अबरामचा जन्म सरोगसीद्वारे झाला होता.