पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत बॉबी देओलने सांगितले होते की, मी कामासाठी वणवण फिरत होतो. मला त्यासाठी प्रचंड प्रतीक्षा करावी लागली. जेव्हा तुम्ही बरीच वर्ष पडद्यावर दिसत नाही, तेव्हा लोकांना असे वाटते की, तुम्ही काम करीत नसाल किंवा आळशी असाल. अन्यथा तुम्ही पडद्यावरून निवृत्ती घेतली असून, आनंदी आयुष्य जगण्यास प्राधान्य देत असाल. परंतु माझ्या बाबतीत असे काही नव्हते. खरं तर या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. अपेक्षा करतो की, लोकांनी माझ्याकडे वेगळ्यादृष्टीने बघण्याचा प्रयत्न करावा.}}}} ">Deeply touched by your surprise visit to the farm today... you will always be a son to me @BeingSalmanKhanpic.twitter.com/2DSEObQYSR— Dharmendra Deol (@aapkadharam) December 29, 2017
अचानकच धर्मेंद्र यांना भेटायला गेला टायगर सलमान खान; पण का? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 15:15 IST
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान अचानकच दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी गेला. सलमानच्या या अचानकच्या भेटीमुळे धर्मेंद्र चांगलेच भावनिक झाल्याचे ...
अचानकच धर्मेंद्र यांना भेटायला गेला टायगर सलमान खान; पण का? जाणून घ्या!
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान अचानकच दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी गेला. सलमानच्या या अचानकच्या भेटीमुळे धर्मेंद्र चांगलेच भावनिक झाल्याचे दिसून आले. सलमानने धर्मेंद्र यांच्यासोबत ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटामध्ये काम केले होते. या भेटीचा एक फोटो धर्मेंद्र यांनी ट्विटरवर शेअर केला असून, त्याच्या कॅप्शनमध्ये अतिशय भावनिक अशा शब्दांचा त्यांनी वापर केला. त्यांनी लिहिले की, फार्मवर तू अचानकच भेटीसाठी आल्यामुळे मी खूप भावनाविवश झालो... तू नेहमीच माझ्या मुलाप्रमाणे राहिला आहेस... सलमान खान.’ ८२ वर्षीय धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओल हा सलमानसोबत ‘रेस- ३’मध्ये काम करीत आहे. बॉबीनेदेखील त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. दरम्यान, रेस या अतिशय अॅक्शन सीरिजच्या तिसºया चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. सध्या हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटात बरेचसे मोठे स्टार असून, धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओल याच्या करिअरच्या दृष्टीने हा चित्रपट खूपच महत्त्वपूर्ण समजला जात आहे. चित्रपटात सलमान, बॉबीसह, अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडिज, डेजी शाह, शाकिब सलीम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला कोरिओग्राफर रेमो डिसूजा दिग्दर्शित करीत आहे. ‘रेस-३’ची शूटिंग गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झाली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदच्यानिमित्त रिलीज होणार आहे. या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन, इमरान हाशमी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या नावाचीही चर्चा होती.