सारा अली खानच्या ‘त्या’ व्हिडीओमधील बेसुºया आवाजाची उडविली जाते खिल्ली, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 19:25 IST
साराचा एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत असून, याच व्हिडीओमुळे ती ट्रोल होत आहे.
सारा अली खानच्या ‘त्या’ व्हिडीओमधील बेसुºया आवाजाची उडविली जाते खिल्ली, पाहा व्हिडीओ!
अभिनेता सैफ अली खान अन् अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान हिचा अनसीन व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सारा तिच्या मित्रांबरोबर असून, अतिशय बेसूर अशा आवाजात गाताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने त्यावरून साराला ट्रोलही केले जात आहे. व्हिडीओमध्ये सारा तिच्या मित्रांबरोबर मस्ती करत आहे. ती बेडवर बसून ‘आशिक-२’चे गाणे अतिशय बेसुºया अशा आवाजात गात आहे. बाजूलाच तिचा एक मित्र गिटार वाजवित तिच्या या गाण्याला जणूकाही दादच देत आहे. तर तिच्या या विचित्र गायिकेमुळे इतर मित्रांचे मनोरंजन होत आहे. या व्हिडीओमुळे सारा ट्रोल करण्याचे एक खास कारण आहे. कदाचित व्हिडीओ बघितल्यानंतर लगेचच लक्षातही येईल. होय, आताची सारा अन् व्हिडीओमध्ये दिसत असलेली सारा खूपच वेगळी आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेली सारा खूप फॅट दिसत असून, त्यावरूनच तिला ट्रोल केले जात आहे. त्याचबरोबर तिच्या बेसूर आवाजाचीही खिल्ली उडविली जात आहे. सध्या सारा केदारनाथ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. चित्रपटात तिच्या अपोझिट अभिनेता सुशांतसिंग राजपूत दिसणार आहे. सध्या सारा या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. नियमितपणे वर्कआउट करण्यावर ती भर देत असल्याने सध्या तिचा फिगर अतिशय स्लीम आहे. दरम्यान, साराचा हा व्हिडीओ चित्रपटांमध्ये येण्याअगोदरचा असल्यानेच कदाचित ती फॅट दिसत असावी.