Join us

​अशी रंगली श्रद्धाची प्री-बर्थ डे पार्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 14:30 IST

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर उद्या ३ मार्चला आपला वाढदिवस साजरा करणार आहे. पण त्यापूर्वी रंगली ती श्रद्धाची प्री-बर्थ डे ...

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर उद्या ३ मार्चला आपला वाढदिवस साजरा करणार आहे. पण त्यापूर्वी रंगली ती श्रद्धाची प्री-बर्थ डे पार्टी. श्रद्धाने गतवर्षी तिचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला होता. पण यंदाचा वाढदिवस ती आपल्या मित्रांसोबत युरोपमध्ये साजरा करणार आहे.आज श्रद्धा युरोपसाठी रवाना झाली.  त्यामुळे १ मार्चच्या रात्रीच तिने आपल्या कुटुंबीयांसोबत प्री-बर्थ डे पार्टी सेलिब्रेट केली. या सेलिब्रेशनचा एक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.या फोटोत श्रद्धासोबत तिचे पप्पा शक्ती कपूर, मम्मी शिवांगी कपूर, मावशी पद्मिनी व तेजस्विनी कोल्हापुरे, श्रद्धाचा मोठा भाऊ सिद्धार्थ कपूर असे सगळेजण दिसत आहेत. बर्थ डे पूर्वी कुटुंबासोबत सेलिब्रेशन...बेस्ट टाईम...असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.श्रद्धाने अलीकडे अपूर्व लाखिया यांच्या ‘हसीना पारकर’ या चित्रपटाचे पहिले शूटींग शेड्यूल संपवले. याचदरम्यान काही कमर्शिअलची शूटींगही हातावेगळी केली. आता श्रद्धाने दहा दिवसांचा ब्रेक घेतला आहे.‘हसीना द क्वीन आॅफ मुंबई’ हा चित्रपट दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा आहे. या बायोपिकमध्ये श्रद्धा साकारणार असलेली व्यक्तिरेखा १७ ते ४० वर्षे वयोगटातील असणार आहे. निश्चितपणे यासाठी श्रद्धाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. अलीकडे एका मुलाखतीदरम्यान खुद्द श्रद्धाने हसीना पारकरची व्यक्तिरेखा साकारणे तिच्यासाठी एक आव्हान असल्याचे म्हटले होते. या भूमिकेला अधिकाधिक जिवंत करण्याचे माझे प्रयत्न आहेत. मी यासाठी अपार मेहनत घेतेय. प्रत्यक्षात हसीना पारकर यांना मला भेटता येणार नाही, याचे मला दु:ख आहे,(हसीना पारकर हिचे २०१४ मध्ये निधन झाले.) असे श्रद्धा म्हणाली होती.