भूमि पेडणेकरची अशीही अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 19:12 IST
‘दम लगा के हईशा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री भूमि पेडणेकरची डिमांड सध्या वाढली आहे. ६३ व्या राष्ट्रीय ...
भूमि पेडणेकरची अशीही अट
‘दम लगा के हईशा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री भूमि पेडणेकरची डिमांड सध्या वाढली आहे. ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘दम लगा के हईशा’ची सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून निवड झाली, तेव्हा भूमि अश्रू रोखू शकली नाही. ‘दम लगा के हईशा’ लोकांना आवडल्यानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची चर्चा सुरु झाली आहे. भूमिला याबाबत विचारले असता तिने मोठे मजेदार उत्तर दिले. मी ‘दम लगा के हईशा’च्या सिक्वलमध्ये काम करण्यास एकाच अटीवर तयार होईल आणि ती अट म्हणजे आयुष्यमान वजन वाढवेल, तेव्हाच ती या सिक्वलमध्ये काम करेल, असे ती म्हणाली. याचे कारण विचारल्यावरही तिने मोठे मजेदार उत्तर दिले. ती म्हणाली, ‘दम लगा के हईशा’चे शूटींग करताना माझे वजन ९० किलो होते. एका सीनसाठी आयुष्यमानच्या पाठीवर बसताना मला काय वाटेल असेल हे मीच जाणते. देव जाणो, आयुष्यमानने हा सीन कसा केला असेल. म्हणून ‘दम लगा के हईशा’चा सिक्वल आलाच तर आयुष्यमान मला थोडा तरी लठ्ठ हवा आहे...अर्थात हा गमतीचा भाग...पण ‘दम लगा के हईशा’ला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्याने भूमि जाम आनंदात आहे. या चित्रपटासाठी भूमिने ३० किलो वजन वाढवले होते. आता भूमि पुन्हा पूर्ववत चवळीची शेंग झालीय...आणि लवकरच ती ‘मनमर्जिया’मध्ये दिसणार आहे...