Join us

आऱ के़ स्टुडिओमध्ये अशी रंगायची होळी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 10:48 IST

बॉलिवूड आणि होळीचे जुने नाते आहे. बॉलिवूड स्टार्सवरही होळीचा असा काही रंग चढतो की, तुम्हीही कल्पना करू शकणार नाही. ...

बॉलिवूड आणि होळीचे जुने नाते आहे. बॉलिवूड स्टार्सवरही होळीचा असा काही रंग चढतो की, तुम्हीही कल्पना करू शकणार नाही.  केवळ प्रेक्षकांना रिझवण्यासाठीच नाही तर खºया आयुष्यातही अनेेंक बॉलिवूड स्टार्स जमून होळी खेळायचे. स्वत:चे स्टारडम बाजूला ठेवून सगळे होळीच्या रंगात न्हाऊन निघायचे.एकेकाळी बॉलिवूडची होळी म्हणजे राज कपूर यांच्या आरक़े़ स्टुडिओमधील होळी असे समीकरण होते. राज कपूर यांचे वडिल पृथ्वीराज कपूर आधी स्टुडिओमधील लोकांसोबत होळी खेळायचे.त्यांच्यानंतर राज कपूर यांनी ही होळी लोकप्रीय बनवली.१९५२ पासून आऱ के़ स्टुडिओत अख्खे बॉलिवूडची होळी रंगायची. एका मोठ्या टँकमध्ये रंग आणि दुसºया टँकमध्ये भांग तयार केली जायची. प्रत्येकाला रंगाच्या टँकमध्ये बुडवले जायचे़ प्रत्येकाचे स्वागत असेच व्हायचे. एकदा वैयजंतीमाला यांना सगळ्यांनी उचलून या रंगांच्या टँकमध्ये बुडवले होते.राजकपूर यांच्या होळी सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणे, त्याकाळात सन्मान समजला जायचा़ या सेलिब्रेशनमध्ये केवळ देवआनंद नसायचे़ कारण त्यांना रंग आवडत नसत़ रंगांसोबत नाच-गाणे, मस्ती असे सगळे चालायचे़ शंकर जयकिशनसारखे संगीतकार मैफिल सजवायचे आणि मग सगळेजण त्यावर ठेका धरायचे़होळीच्या या धम्माल मस्तीदरम्यान कुणीही भुकेले राहू नये, याचा सगळा जिम्मा नर्गिस सांभाळायच्या. त्यांना असा काही दरारा असायचा की, कुणीही न जेवता आऱ के़ स्टुडिओबाहेर जाऊ शकायचे नाही. म्हणूनच आरक़े़मधील होळीला ‘भांग आणि फूड फेस्टिवल’ म्हटले जायचे.७० च्या दशकात चित्रपट व्यवसायात काहीशी मंदी आली आणि तसे आऱ के़ स्टुडिओमधील होळीचे रंगही फिके पडायला लागले.  पण ‘बॉबी’ हिट झाला आणि राज कपूर पुन्हा त्याच रंगात परतले. प्रत्येक होळीला काही तृतीयपंथी आऱ के़ स्टुडिओमध्ये येत़ यानंतर धम्माल नाचगाणे व्हायचे. राज कपूर आपल्या नव्या चित्रपटाचे गाणे सर्वप्रथम त्यांनाच ऐकवायचे. ‘राम तेरी गंगा मैली’मधील सुन साहिबा सुन हे गाणे सर्वप्रथम याच तृतीयपंथियांनी पास केले होते, असे मानले जाते़ राज कपूर यांचे आजारपण आणि पुढे निधनामुळे आरक़े़मधील लोकप्रीय होळी संपली. पण त्या होळीच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत.राज कपूर यांच्या होळीनंतर अमिताभ यांच्या प्रतीक्षा बंगल्यातील होळी लोकप्रीय झाली़ प्रतीक्षामधील गार्डनमध्ये दरवर्षी होळी खेळली जाऊ लागली. मात्र पित्याच्या निधनानंतर प्रतीक्षामधील होळीचे रंगही कायमचे फिके पडले़सुभाष घई यांच्या मड आयलंड या बंगल्यातील होळी सुद्धा अशीच लोकप्रीय होती़ पण तो काळही संपला़ याच काळात यश चोप्रा यांच्या यशराज स्टुडिओतील होळी लोकप्रीय झाली होती़ पण तो काळही मागे गेला. सध्या बॉलिवूडचे स्टार्स त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसोबत होळी साजली करतात. सध्या शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या घरी धम्माल होळी रंगते, तेवढेच.