बॉलिवूड अभिनेता गोविंदा(Govinda)ची पत्नी सुनीता आहूजा (Sunita Ahuja) नेहमीच चर्चेत असते. सध्या ती कलर्स टेलिव्हिजनवर या वीकेंडला प्रसारित होणाऱ्या 'पती पत्नी और पंगा - जोडियों का रिॲलिटी चेक' या रिॲलिटी शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये दिसणार आहे. आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये सुनीता, गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर बोलताना दिसत आहे. या अफवांना नकार देत ती म्हणाली की, ६२ वर्षांचा माणूस, ज्याला मोठी मुलं आहेत, अशा चुका कधीच करणार नाही.
कलर्स टीव्हीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या 'पती पत्नी और पंगा'च्या लेटेस्ट प्रोमोमध्ये अभिषेक कुमार सुनीता आहूजाला विचारताना दिसत आहेत, "संपूर्ण भारताला तुमच्या आणि गोविंदा जी यांच्याबद्दलच्या बातम्या जाणून घ्यायच्या आहेत. खूप लोक अफवा पसरवत असतात. त्यांना तुम्ही काय सांगाल?" यावर प्रतिक्रिया देत सुनीता म्हणाली की, "४० वर्षं एकत्र राहणं काही सोपी गोष्ट आहे का? प्रत्येक माणूस चूक करतो. प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं. पण ६२ वर्षांच्या वयात, जेव्हा इतकी मोठी मुलं आहेत, तेव्हा माणूस चूक करेल का?"
सुनीता-गोविंदाच्या घटस्फोटाच्या पसरलेल्या अफवागेल्या महिन्यात, हॉटरफ्लायच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, सुनीता आहूजाने हिंदू विवाह कायदा, १९५५च्या कलम १३ (१)(i), (ia), (ib) नुसार गोविंदा यांच्यापासून घटस्फोटासाठी अर्ज केला होता. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, न्यायालयाने २५ मे रोजी गोविंदा यांना बोलावले होते आणि जूनपासून दोघेही प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत होते. सुनीता कथितपणे कोर्टात हजर होत्या, तर गोविंदा गैरहजर होते. या अफवांना गोविंदाचा वकील ललित बिंदल यांनी फेटाळले होते आणि सांगितले होते की, दोघांमध्ये सर्वकाही ठीक आहे. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी पीटीआयला सांगितले होते, "ही तीच जुनी बातमी आहे जी सहा-सात महिन्यांपूर्वी आली होती. सुनीताने सहा-सात महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता, आता सर्व काही मिटले आहे आणि एक-दोन आठवड्यात सर्वांना ही बातमी कळेल."
सुनीता-गोविंदाने एकत्र केलेलं गणपतीचं स्वागतनुकत्याच झालेल्या गणेश चतुर्थी २०२५ च्या वेळी, गोविंदा आणि सुनीता आहूजा यांनी एकत्र घरी गणपती बाप्पाचे स्वागत केले. यावेळी माध्यमांशी बोलताना, त्यांनी घटस्फोटाच्या अफवांना फेटाळून लावत म्हटले, "आज आम्ही इतके जवळ आहोत, जवळ... जर काही झाले असते तर आम्ही इतके जवळ असतो का? आमच्यामध्ये अंतर राहिले असते! कोणीही आम्हाला वेगळे करू शकत नाही, मग तो स्वर्गातून आलेला देव असो, किंवा कोणी सैतान असो. कोणीही आम्हाला वेगळे करू शकत नाही."