‘नीरजा’चा सक्सेस बॅश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 08:59 IST
‘नीरजा’ तील अप्रतिम अभिनयाने सोनम कपूरने आपल्या टीकाकारांची तोंडे बंद केली. प्रेक्षकांनीही चित्रपट डोक्यावर घेतला. यामुळे सोनम सध्या जाम ...
‘नीरजा’चा सक्सेस बॅश
‘नीरजा’ तील अप्रतिम अभिनयाने सोनम कपूरने आपल्या टीकाकारांची तोंडे बंद केली. प्रेक्षकांनीही चित्रपट डोक्यावर घेतला. यामुळे सोनम सध्या जाम आनंदात आहे. ‘नीरजा’चे यश साजरे करणासाठी मंगळवारी रात्री बांद्रा येथे सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली. या पार्टीत सोनम ब्ल्यू मॅक्सीमध्ये अवतरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. या पार्टीत शबाना आझमी, राम माधवानी, अतुल कस्बेकर आणि चित्रपटाची अन्य स्टारकास्टही हजर होती.