Join us

style war between raees and kabil : हृतिक रोशन स्टाईलमध्ये शाहरुख खानला पछाडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 19:50 IST

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचा ‘रईस’ व हृतिक रोशन यांचा ‘काबिल’ या चित्रपटांची बॉक्स आॅफिसवर लढत होत आहे. दोन्ही ...

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचा ‘रईस’ व हृतिक रोशन यांचा ‘काबिल’ या चित्रपटांची बॉक्स आॅफिसवर लढत होत आहे. दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहेत. दोन्ही चित्रपटात अनेक गोष्टींचे साम्य देखील आहे. मात्र अशातच दोन्ही चित्रपटातील कलाकारांची ‘स्टाईल’ चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे. ‘रईस’मध्ये शाहरुख खान नव्या अवतारात चाहत्यांना पहायला मिळणार आहे. ‘रईस’ची कथा ८०च्या दशकातील असल्याने त्या काळातील कॉश्च्यूमचा वापर करण्यात आले आहेत. ‘बेल बॉटम’ पँट, शर्टाच्या मोठ्या कॉलर, हलक्या रंगाचे कपडे हे रईसमधील शाहरुख खानच्या कॉश्च्यूमचे वैशिष्ठ्य. ‘रईस’मध्ये शाहरुख खान गरीब घरात जन्मलेला व श्रीमंत झालेला व्यक्ती होतानाचा प्रवास दाखविण्यात आल्याने त्याच्या कॉश्च्यूममधून त्याचा प्रवास दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.Read More : ​रईस- काबिलमध्ये या गोष्टींचे आहे साम्य‘रईस’ची कॉश्च्यूम डायरेक्टर शीतल शर्मा हिने शाहरुखच्या लुक सोबत नवे प्रयोग केले आहेत. ‘रईस’मधील पठाणी घाललेला शाहरुखच्या लुकची जबरदस्त क्रेझ चाहत्यांत निर्माण झाली आहे. ‘रईस’मधील शाहरुख खानने परिधान केलेली ‘पठानी’ स्टाईलची कॉपी करताना दिसत आहेत. शाहरुख खानची स्टाईल त्याचे चाहते फॉलो करीत असतात. Read More : war begins with advance booking : ‘काबिल’चा पहिला शो ‘रईस’ सोबतचदुसरीकडे हृतिक रोशनने ‘काबिल’ या चित्रपटात एका युवकाची अंध व्यक्तीची भूमिका साकारली आहे. हृतिक रोशनने आजपर्यंत केलेल्या भूमिकेच्या उलट ‘काबिल’मधील भूमिका असल्याने त्याला भूमिकेअनुरुप योग्य लुक देणे हे कठीण होते. काबिलच्या कॉश्च्यूम डायरेक्टर  करिश्मा आचार्य व नाहीद शाह यांना यासाठी बरीच मेहनत करावी लागली आहे. ‘काबिल’चा ट्रेलर पाहिल्यावर हृतिकचे कॉश्च्यूम आकर्षक असल्याचे दिसते. Read More : ​सलमानने शेअर केल्या जुण्या आठवणी; शाहरुख, हृतिकला दिल्या शुभेच्छा‘काबिल’च्या पूर्वार्धात हृतिक रोमांटिक भूमिकेत दिसणार असल्याने त्याचे कॉश्च्यूमही साधे ठेवण्यात आले आहेत. पूर्वार्धात साध्या शर्ट-पँट किंवा टी-शर्ट व जिन्समध्ये दिसणारा हृतिक अधिकच स्टायलीश दिसतो आहे. तर उत्तरार्धात अंध हृतिक आपल्या पत्नीच्या हत्येचा बदला घेणारा चाणाक्ष अंध व्यक्तीची रंगविणार असल्याने त्याचे कॉश्च्यूम भूमिका अधिक प्रभावी करणारे असल्याचे दिसतात. ‘काबिल’मध्ये हृतिकने परिधान केलेले जॅकेट्स व टी शर्ट युवकांत चांगलेच फेसम होत आहेत. हृतिक रोशनची स्टाईल ही कोणत्याही युवकाला भूरळ घालू शकते. या पूर्वीच्या हृतिकच्या चित्रपटाचा अनुभव पाहता त्याची स्टाईल लवकर अडॉप्ट केली जाते असे दिसते. ALSO READ : 'काबिल'सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हृतिक रोशनची EX-Wife सुझैन खानने मुलांसह लावली हजेरी​तर ‘काबिल’ व ‘रईस’ यांनी केली असती ३०० कोटींची कमाई