Join us
Daily Top 2Weekly Top 5

Stunning : गोलमाल रिटर्न्स फेम अंजना सुखानीने केले हॉट फोटोशूट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 19:06 IST

बॉलिवूड अभिनेत्री अंजना सुखानी हिने नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट केले. तिच्या या फोटोशूटनी सध्या सोशल मीडियावर धूम उडवून दिली असून, ...

बॉलिवूड अभिनेत्री अंजना सुखानी हिने नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट केले. तिच्या या फोटोशूटनी सध्या सोशल मीडियावर धूम उडवून दिली असून, त्यास यूजर्सकडून पसंतही केले जात आहे. या फोटोमध्ये ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. बºयाच काळानंतर अंजनाने तिचा सेक्सी अवतार प्रेक्षकांना दाखविला आहे. वास्तविक अंजनाचे गेले काही बॉलिवूड चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत, परंतु तिच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली असून, ती पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, सध्या अंजना तिच्या नव्या लूकवर काम करीत आहे. त्याचबरोबर ती तिची पर्सनॅलिटी आणखी आकर्षक दिसावी म्हणूनही प्रयत्न करताना दिसत आहे. मिड डेच्या रिपोर्टनुसार, अंजना लवकरच एक वेबसीरिज साइन करू शकते. काही दिवसांपूर्वी जेव्हा अंजनाच्या एका जवळच्या नातेवाइकाचे निधन झाले होते. तेव्हा तिला खूपच धक्का बसला होता. त्यातून तिला सावण्यासाठी बराच काळ लागला. आता ती पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात पूर्ण ताकदीनिशी उभी राहिली आहे. आता तिला भूतकाळ विसरून पुढे जायचे आहे. अंजनाने ‘संडे, गोलमाल रिर्टन्स, सलाम-ए-इश्क’ यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये काम केले आहे. दरम्यान, अंजना तिच्या या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली असून, सोशल मीडियावर तिचे हे फोटो चांगलेच पसंत केले जात आहेत.